Haryana BJP News : हरियाणात भाजपला आणखी एक धक्का! ; माजी उपपंतप्रधान देवीलाल यांच्या नातवानेही सोडला पक्ष

Aditya Devilal grandson of former Deputy Prime Minister Devilal : जाणून घ्या, कोणत्या पक्षात केला आहे प्रवेश; ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हरियाणात भाजपला गळती लागल्याचे दिसत आहे.
Haryana BJP
Haryana BJPSarkarnama
Published on
Updated on

Aditya Devilal left the BJP In Haryana : भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी उपपंतप्रधान देवीलाल यांचे नातू आदित्य देवीलाल यांनी रविवारी इंडियन नॅशनल लोकदल(इनेलो) पक्षात प्रवेश केला. हरियाणात ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ते डबवाली येथून मैदानात उतरणार आहेत.

आदित्य देवीलाल यांनी सिरसा जिल्ह्याच्या चौटाला गावात 'इनेलो'च्या रॅलीत पार्टीचे वरिष्ठ नेते अभय सिंह चौटाला यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. आदित्य देवीलाल यांनी अशातच हरियाणा मार्केटिंग बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

त्यांच्या इनेलोमधील प्रवेशामुळे भाजपने(BJP) ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सिरसा जिल्ह्यातील आपला प्रमुख चेहरा गमावला आहे. हरियाणात भाजपमध्ये नेत्यांचे राजीनामा सत्र सुरूच आहे, मागील काही दिवसांत अनेक नेत्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाची चिंता वाढलेली आहे.

Haryana BJP
Haryana Assembly Election : हरियाणा विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी अन् काँग्रेस एकत्र लढणार!

तेच एका आठवड्याच्या आतच भाजप सोडणारे देवीलाल यांच्या परिवारातील आदित्य देवीलाल हे दुसरे सदस्य आहेत. कारण काही दिवस आधीच राज्याचे उर्जा आणि तुरुंग प्रशासन मंत्री रणजीत चौटाला यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली होती, ते देवीलाल यांचे पुत्र आहेत.

Haryana BJP
Haryana Election : मोठा निर्णय! हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल, जम्मू-काश्मिरचा निकाल कधी?

इनेलोमध्ये प्रवेश करण्याआधी आदित्य यांनी त्यांचे काका आणि माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्या निवासस्थानी जावून त्यांचे आशीर्वाद घेतले. तर रॅलीला संबोधित करताना आदित्य देवीलाल यांनी म्हटले की, ते नेहमीच लोकांसाठी उभा असतात आणि यापुढेही राहतील.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com