Congress News : 'भारत जोडो'नंतर काँग्रेसचा हा आहे नवा मोठा प्लॅन

Bharat Jodo Yatra : प्रियांका गांधींवरही सोपवली मोठी जबाबदारी...
Congress
Congress Sarkarnama

Bharat Jodo Yatra : काँग्रेसच्या'भारत जोडो' यात्रेनंतर आता 'हाथ से हाथ जोडो' हे अभियान सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसची'भारत जोडो' यात्रा संपण्याआधीच काँग्रेसचा पुढचा प्लॅन ठरला आहे.

काँग्रेस (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी बैठकीत काँग्रेस पक्ष वाढीसाठी मोठी घोषणा करण्यात आली. भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसने पुढील रणनीती आखत 'हाथ से हाथ जोडो' या अभियानाची घोषणा केली.

या अभियानाबाबत काँग्रेसचे नेते के.सी.वेणुगोपाल यांनी सांगितलं,''भारत जोडो यात्रेनंतर 26 जानेवारीपासून देशभरात 'हाथ से हाथ जोडो अभियान' सुरू करण्यात येणार आहे. या प्रचारासाठी पक्ष, ब्लॉक, पंचायत आणि बूथ स्तरावर जनसंपर्क वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. हे अभियान दोन महिने चालणार असून या अभियानामार्फत राहुल गांधी यांचे पत्र देखील लोकांच्या हाती दिले जाणार आहे. या अभियानामार्फत राहुल गांधी यांचे पत्र देखील लोकांच्या हाती दिले जाणार असून ज्यामध्ये या अभियानाचा संदेश असेल. त्यासोबत मोदी सरकारच्या विरोधात एक आरोपपत्रही जोडले जाणार आहे'', असे त्यांनी सांगितले.

Congress
Narendra Modi : गुजरात निवडणुकीच्या मतदानापूर्वी पंतप्रधान मोदींनी आईची भेट घेऊन घेतले आशीर्वाद

त्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) म्हणाले, ''भारत जोडो यात्रा 24 डिसेंबरला दिल्लीत पोहोचेल. 26 जानेवारीला श्रीनगरमध्ये यात्रेची सांगता होईल. या नंतर 'हाथ से हाथ जोडो अभियान' अंतर्गत तीन स्तरीय कार्यक्रम होणार आहे. ब्लॉक आणि बूथ स्तरावर यानंतर यात्रा काढण्यात येणार आहे. अर्थात जिल्हा स्तरावर अधिवेशने आणि राज्य स्तरावर रॅली काढण्यात येणार आहेत. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्रा या देखील 'हथ से हाथ जोडो अभियान'ला उपस्थित राहणार आहेत'', असं त्यांनी सांगितलं.

Congress
Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दर कपातीची चर्चा प्रत्येक्षात येणार का?

प्रियांका गांधींवर मोठी जबाबदारी

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी आज काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. यामध्ये 'भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेनंतर 'हाथ से हाथ जोडो' या अभियानाची घोषणा करण्यात आली. तसेच प्रियांका गांधी (priyanka gandhi) यांच्यावरही मोठी जबाबदारी सोपावण्यात आली. प्रियांका गांधी या आता प्रत्येक राज्यात महिला मोर्चाचे नेतृत्व करणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com