नाराज आमदारांची व्हॉट्सअॅप ग्रुपमधून एक्झिट अन् भाजप नेत्यांची पळापळ

भाजपच्या (BJP) आमदारांनी पक्षाच्या अनेक अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमधून एक्झिट घेतली आहे.
BJP

BJP

Sarkarnama

कोलकता : भाजपने राज्य कार्यकारिणीत मोठे फेरबदल केले आहेत. यात अनेक बड्या नेत्यांना डावलण्यात आले आहे. कार्यकारिणीत डावलण्यात अनेक नेते नाराज आहेत. यावरुन भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. भाजपच्या पाच आमदारांनी पक्षाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमधून एक्झिट घेतली आहे. हे आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याने भाजप नेतृत्वाच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) भाजपने (BJP) नुकतीच राज्य कार्यकारिणी जाहीर केली. नेतृत्वाने तातडीने या आमदारांशी (MLA) संपर्क साधण्यास सुरवात केली आहे. काही गैरसमज झाले असून, ते दूर केले जातील, अशी मवाळ भूमिका पक्ष नेतृत्वाने घेतली आहे. या नेत्यांनी थोडा संयम ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. मुकुटमणी अधिकारी, सुब्रत ठाकूर, अंबिका रॉय, अशोक किर्तनिया आणि असीम सरकार या 5 आमदारांनी पक्षाच्या अनेक अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमधून एक्झिट घेतली आहे. राज्य कार्यकारिणीत स्थान न दिल्याने या आमदारांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. यातील बहुतांश खासदार हे मटुआ समाजातील आहेत.

<div class="paragraphs"><p>BJP </p></div>
भाजपला लवकरच मोठा धक्का! पाच आमदार पक्ष सोडण्याच्या वाटेवर

याबाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांत मुजुमदार म्हणाले की, आमच्यासारख्या मोठ्या पक्षात काही वेळा अशी समस्या निर्माण होते. आम्ही संबंधित नेत्यांशी चर्चा करीत आहोत. त्यांनी चुकीने व्हॉट्सॅप ग्रुप सोडले आहेत. काहीतरी गैरसमज झाले आहेत. आमचे मटुआ समाजाशी अतिशय चांगले संबंध आहेत. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत या समाजाचा आम्हाला पाठिंबा होता. राज्य कार्यकारिणीत अनेक जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे या नेत्यांनी संयम राखावा.

<div class="paragraphs"><p>BJP </p></div>
मुकुल रॉय यांचं मानसिक संतुलन बिघडलं! पक्षानेच केला खुलासा

भाजपने तडकाफडकी पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. पक्षाने नवीन राज्य कार्यकारिणीची घोषणा केली आहे. यात अनेक बड्या नेत्यांना वगळण्यात आले आहे. याचवेळी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सुकांत मुजुमदार यांनी सप्टेंबर महिन्यात स्वीकारल्यानंतर फेरबदल होणे अपेक्षित होते. मात्र, कोलकता महापालिका निवडणुकीमुळे ते लांबणीवर पडले होते. अखेर महापालिका निवडुकीतील दारुण पराभवानंतर याला मुहूर्त मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com