राणेंनंतर मोदी सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत; कधीही होऊ शकते अटक

मोदी सरकारमधील (Modi Government) आणखी एक मंत्री आता अडचणीत आला आहे.
Bishweswar Tudu and Narayan Rane
Bishweswar Tudu and Narayan Rane Sarkarnama

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यानंतर मोदी सरकारमधील (Modi Government) आणखी एक मंत्री (Union Minister) आता अडचणीत आला आहे. आचारसंहितेच्या काळात त्यांनी दोन वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील एका अधिकाऱ्याचा हात मोडला असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग विभागाचे मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य त्यांना भोवले होते. या अटकेवरून मोठा गदारोळ उडाला होता. आता मोदी सरकारमधील केंद्रीय राज्यमंत्री विश्वेश्वर टुडू (Vishweshwar Tudu) हे अडचणीत आले आहेत. ते आदिवासी व जलशक्ती विभागाचे राज्यमंत्री आहेत. त्यांनी आचारसंहिता लागू असताना ओडिशामध्ये दोन सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी आता मुद्दा लावून धरला असून, टुडू यांच्या कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Bishweswar Tudu and Narayan Rane
केंद्रीय मंत्री अडचणीत! फाईल नाही आणली म्हणून अधिकाऱ्याचा हातच मोडला

टुडू हे ओडिशातील खासदार आहेत.मयूरभंज जिल्ह्यातील बारिपाडा येथील भाजप (BJP) कार्यालयात नुकतीच बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हा नियोजन मंडळाचे सहाय्यक संचालक देवाशिष महापात्रा आणि उपसंचालक अश्विनी मलिक यांना बोलावण्यात आले होते. राज्यात पंचायत निवडणुकांमुळे आचारसंहिता असल्याने या बैठकीला हे सरकारी अधिकारी फायली घेऊन गेले नव्हते. यामुळे संतापलेल्या टु़डू यांनी प्लॅस्टिकच्या खुर्चीने अधिकाऱ्यांना मारहाण करण्यास सुरवात केली. यात महापात्रा यांचा हात मोडला आहे. (Bishweswat Tudu News)

Bishweswar Tudu and Narayan Rane
मोठी बातमी : उत्पल पर्रीकर माघार घेण्यास तयार पण एका अटीवर

विश्वेश्वर टुडू हे मयूरभंजचे भाजप खासदार आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपद मिळाले. केंद्रीय मंत्र्यांनी भाजपच्या कार्यालयात असलेल्या त्यांच्या कार्यालयात ही बैठक बोलावली होती. टुडू यांनी दरवाजा बंद करून खुर्चीने मारहाण केल्याचा आरोप दोन्ही अधिकाऱ्यांनी केला आहे. या हल्ल्यात महापात्रा यांचा हात मोडला असून, मलिक जखमी झाले आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांना बारीपाडा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Bishweswar Tudu and Narayan Rane
Vishal Phate Scam : 'अब तक 99'! फसवणुकीचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय

या दोन्ही अधिकाऱ्यांनी टुडू यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मंत्र्यांनी केलेल्या मारहाणीत माझा डाव हात मोडला आहे, असे महापात्रा यांनी रुग्णालयातून बोलताना सांगितले. या प्रकरणी बारिपाडा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दुखापत करणे, गंभीर इजा करणे, शिवीगाळ करणे, धमकावणे आदी आरोपांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामुळे मंत्री टुडू आता चांगलेच अडचणीत आल्याचे मानले जात आहे,

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com