नवाब मलिकांनंतर ईडीचा 'नेम' कुणावर? भाजपने सांगितले नाव

NCP | Nawab Malik | ED | Sanjay Raut |BJP : नवाब मलिक यांना ईडीने आज सकाळी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
BJP
BJPSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांच्यावर ईडीने आज सकाळी ईडीने कारवाई केली आहे. सकाळी ७ वाजता ईडी अधिकाऱ्यांनी धाड टाकली. त्यानंतर ईडीने मलिक यांना ताब्यात देखील घेतले आहे. त्यांना ईडीने आपल्या कार्यालयात नेले असून चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. ते स्वतः ईडीच्या कार्यालयात हजर झाले असल्याचीही माहिती आहे.

नवाब मलिक यांची दाऊद इब्राहिम मनिलाँड्रिंग प्रकरणात चौकशी सुरु असल्याचे ही कळत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी ईडीने मुंबईतील काही जमीन व्यवहारांशी संबंधित अंडरवर्ल्डशी संबंधित इकबाल कासकर आणि हसीना पारकर यांची चौकशी केली होती. त्यानंतर याच प्रकरणाशी संबंधित काही लोकांची ही चौकशी करण्यात आली होती. भाजपचे नेते आणि राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांच्यावर याबाबत आरोप केले होते.

BJP
मोठी बातमी; नवाब मलिकांच्या घरी ईडीचा छापा; २ तासांच्या कारवाईनंतर घेतले ताब्यात

दरम्यान यावर आता विरोधी पक्ष भाजपने सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे आणि जोडीला पुढचे टार्गेट कोण असणार हे नाव देखील सांगितले आहे. भाजपने ट्विटमध्ये म्हटले आहे की, पहाटेच नवाब मलिक यांची ईडीच्या कार्यालयात हजेरी! आता नवाब मलिक यांना कळलं असेल की, पत्रकार परिषद घेऊन, वाट्टेल तसं बोलून जर गुन्हा केला असेल तर तो लपवू शकत नाही. तसेच कारवाईच्या भीतीने पत्रकार परिषद घेऊन आग पाखड करणाऱ्या आणखी एका नेत्याने लक्षात घेतलं पाहिजे. कर नाही तर डर कशाला? असा उपरोधिक टोला देखील भाजपने लगावला आहे.

या ट्विटमध्ये "कारवाईच्या भीतीने पत्रकार परिषद घेऊन आग पाखड करणाऱ्या आणखी एका नेत्याने लक्षात घेतलं पाहिजे", असं म्हणतं भाजपने एक प्रकारे शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत मागच्या काही दिवसांपासून सातत्याने पत्रकार परिषद घेवून भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, मोहित कंबोज यांच्यावर आरोप करत आहेत. तसेच याबाबत आपण ईडीकडे कागदपत्र देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com