गुजरात निवडणूक : भगतसिंग, आंबेडकरांनंतर 'आप'ला महात्मा गांधींची आठवण

Gujrat | Aam Aadami Party | : पंजाबमध्ये भगतसिंग, गुजरातमध्ये महात्मा गांधी?
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Twitter

गांधीनगर : शहिद भगतसिंग यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम आदमी पक्षाची सुरु असलेली वाटचाल मागच्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. पंजाबमध्ये सत्तेत येण्यापूर्वी आणि सत्तेत आल्यानंतर 'आप'ने भगतसिंग यांना डोळ्यासमोर ठेवून अनेक निर्णय घेतले. यात सरकारी कार्यालयांमध्ये केवळ भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याच प्रतिमा असतील, मुख्यमंत्री भगवंत मान यांचा शपथविधी भगतसिंग यांचे मुळ गाव खटकर कलानमध्ये आयोजित करणे, भगतसिंह यांच्या शहिद दिनी सार्वजनिक सुट्टी जाहिर करणे अशा निर्णयांचा समावेश होता.

याशिवाय मुख्यमंत्री मान, आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि 'आप'च्या पंजाबमधील प्रत्येक प्रचारसभेमध्ये भगतसिंग यांच्या नावाचा उल्लेख आढळायचा. पंजाबचा किल्ला सर केल्यानंतर आता आम आदमी पक्षाने येत्या दिवाळी दरम्यान होणार असलेल्या गुजरात निवडणुकांची तयारी सुरु केली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केजरीवाल आणि एकूणच आम आदमी पक्षाला महात्मा गांधी यांची आठवण आली आहे का असा सवाल विचारला जात आहे.

Arvind Kejriwal
"मला स्पष्ट बोलायला लावलसं तर तुझी अडचण होईल" : अजितदादा-विश्वजीत कदमांमध्ये जुगलबंदी

आम आदमी पक्षाने आज आपल्या ट्विटरवरुन गुजरात निवडणुकीसंदर्भातुन एक ट्विट केले आणि काही फोटो पोस्ट केले. यात अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांचा महात्मा गांधी यांच्या ओळखीचे प्रतिक असलेला चरखा चालवतानाचा फोटो पोस्ट केला आहे. सोबतच याला "चरखा चलेगा, गुजरात बदलेगा!" असं कॅप्शन दिले आहे. केजरीवाल यांच्या या फोटोची आणि या ओळींची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा होत आहे. सोबतच राज्य बदलले की आदर्श पण बदलले का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. युथ काँग्रेसने याबाबत ट्विट करुन केजरीवाल आणि 'आप'वर केवळ संधीसाधू अशी टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com