पहिल्याच दिवशी योगींचा मोठा निर्णय! 15 कोटी जनतेला दिली खूषखबर

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे.
Yogi Adityanath Oth Ceremony
Yogi Adityanath Oth CeremonySarkarnama

लखनौ : उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी काल (ता.25) दुसऱ्यांचा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह भाजपच्या विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, नेत्यांच्या उपस्थितीत योगींची दुसरी इनिंग सुरू झाली. योगींनी आज मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मोठी घोषणा करून राज्यातील जनेतला खूषखबर दिली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी आज पहिली मंत्रिमंडळ बैठक आज घेतली. या बैठकीत त्यांनी मोफत रेशन देण्याची योजनेला आणखी तीन महिने मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे. या योजनेचा फायदा 15 कोटी जनतेला मिळणार आहे. कोरोना संकटाच्या काळात सुरु झालेली ही योजना मार्चमध्ये संपणार होती. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशातील जनतेला मोफत रेशन आणखी तीन महिने मिळणार आहे. गरीबांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा फायदा राज्यांतील जनतेला मिळत आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपने (BJP) सलग दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ही निवडणूक लोकसभेच्या निवणुकीसाठी (LokSabha Election) महत्वाची मानली जात होती. त्यात योगींनी भाजपला बहुमत मिळवून दिले. त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये कोणत्या नेत्यांचा समावेश करावा, यासाठी अनेक दिवस खलबते झाली होती. दिल्लीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह इतर नेत्यांशी चर्चा करून योगींनी नव्या मंत्रिमंडळातील आमदारांची नावे निश्चित केली. (Yogi Adityanath big decision after taking charge as CM)

Yogi Adityanath Oth Ceremony
'आप'चा दे धक्का! एकाच फटक्यात 5 खासदार निवडून आणले

या मंत्रिमंडळातून मोहसीन रजा यांच्यासह प्रतापसिंह, आशुतोष टंडन, सतीश महाना, श्रीकांत शर्मा यांच्यासारख्या नेत्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. निवडणुकीत पराभूत झालेले केशवप्रसाद मौर्य यांच्या गळ्यात पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची माळ टाकण्यात आली आहे. तसेच दिनेश शर्मा यांच्याजागी ब्राम्हण चेहरा म्हणून ब्रजेश पाठक यांनाही उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे. सुरेशकुमार खन्ना, सूर्यप्रताप शाही, स्वतंत्रदेव सिंग, बेबी राणी मौर्य, लक्ष्मीनारायण चौधरी, जयवीर सिंग, धरमपालसिंह, नंद गोपाल गुप्ता, भूपेंद्रसिंह चौधरी, अनिल राजभर, राकेश सच्चन यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले जीतिन प्रसाद यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. आधीच्या मंत्रिमंडळात त्यांचा काही महिन्यांआधीच समावेश करण्यात आला होता. त्यांनी आज पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतली.

Yogi Adityanath Oth Ceremony
राज्यपाल अडचणीत! अखेर सीबीआय चौकशी लागली मागे

मंत्रिमंडळातून डच्चू दिलेले नेते -

आशुतोष टंडन, दिनेश शर्मा, सतीश महाना, श्रीकांत शर्मा, सिद्धार्थनाथ सिंह, महेंद्र सिंह, रामनरेश अग्निहोत्री, जय प्रताप सिंह, नीलकंठ तिवारी, नीलिमा कटियार, अशोक कटरिया, श्रीराम चौहान, जय प्रकाश निषाद, जय कुमार सिंह जैकी, अतुल गर्ग, मोहसिन रजा, सुरेश कुमार पासी, अनिल शर्मा, महेश चंद्र गुप्ता, डा. जीएस धर्मेश, लाखन सिंह राजपूत, चौधरी उदय भान सिंह, रमाशंकर सिंह पटेल, अजित पटेल, रमापति शास्त्री (प्रोटेम स्पीकर), मुकुट बिहारी वर्मा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com