Mamata Banerjee : या दोन राज्यांसाठी ममता बॅनर्जी घेऊ शकतात 'माघार'

TMC and Congress Talks begin : पश्चिम बंगालसह इतर दोन राज्यांतील जागांसाठी TMC इच्छुक
Mamata Banerjee
Mamata BanerjeeSarkarnama
Published on
Updated on

TMC Politics : पश्चिम बंगालमधील 42 जागांवर तृणमूल काँग्रेसने दावा केला आहे. असे असताना तृणमूल काँग्रेसला अजून मेघालय आणि आसाममधील जागा पाहिजे आहेत. इंडिया आघाडीत बिघाडीनंतर काँग्रेस नेत्यांनी तृणमूल काँग्रेससोबत चर्चा सुरू असल्याचा दावा केला आहे.

काँग्रेसला कुठल्याही परिस्थितीत इंडिया आघाडीचा एकोपा कायम ठेवायचा असून, त्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची फळी वारंवार विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या संपर्कात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ममता बॅनर्जी या काँग्रेस व इंडिया आघाडीत चर्चेला येतात की, त्या एकला चालो रे चा नारा कायम ठेवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून मतभेद वारंवार समोर आले आहेत. त्यातून काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा दिला होता. असे असताना आता पश्चिम बंगालच्या काही जागा सोडून तृणमूल काँग्रेसला इतर दोन राज्यांत लोकसभेच्या काही जागा देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.

त्या दृष्टीने पुन्हा एकदा काँग्रेससोबत चर्चा सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील 42 जागांवर दावा करत ममता बॅनर्जी यांनी काँग्रेससोबत चर्चादेखील टाळली होती. पण, आता इतर राज्यांतील जागांवर दावा करत ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमधील काही जागा काँग्रेसला सोडू शकतात, अशी काय ती रणनीती आखली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mamata Banerjee
Delhi Lok Sabha Election 2024: अखेर ठरलं! दिल्लीत 'आप'ची काँग्रेससोबत 'हात' मिळवणी; 'या'फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

काँग्रेस नेत्यांनी चर्चेची दारे खुली असल्याचे सांगत ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालमध्ये जास्तीत जास्त जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व टीएमसी सुप्रिमो ममता बॅनर्जी यांच्याशी काँग्रेस नेत्यांनी चर्चा सुरू केली आहे. जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याचे सूतोवाच काँग्रेस नेते करत असले तरी ममता बॅनर्जी या पश्चिमबंगालमधील 42 जागांसह मेघालय आणि आसाममध्ये लोकसभेचे उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे.

भाजपला लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्याचे तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासमोर एकमेव उद्दिष्ट आहे. त्यामुळे काँग्रेस लोकसभा निवडणुकीत मोठा त्याग करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पश्चिम बंगाल मुद्द्यावरून काँग्रेस व तृणमूल काँग्रेस यांच्यातील चर्चा थांबली असताना मेघालय आणि आसाममध्ये तृणमूल काँग्रेसला लोकसभेच्या जागा पाहिजे असल्याने पुन्हा एकदा दोन्ही पक्षात चर्चा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com