India Alliance News : काँग्रेससह 'इंडिया' आक्रमक; राजधानी दिल्लीत विशेष अधिवेशनासाठी ठरतेय रणनीती ?

INDIA strategy decide Against Modi Govt : "या अधिवेशन काळात कोण-कोणती विधेयकं मांडली जाणार.."
India Alliance News
India Alliance NewsSarkarnama

Delhi News : केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या काळात संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्यानंतर काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी आज मंगळवारी पक्षाच्या नेत्यांची विशेष बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये विशेष अधिवेशनात विरोधकांची रणनिती ठरवली जाणार असून, काँग्रेस आणि विरोधी पक्ष नक्की काय रणनीती ठरवतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. (Latest Marathi News)

India Alliance News
Sharad Pawar NCP Meeting: शरद पवार ‘इलेक्शन मोड’वर; राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांची बोलावली महत्वपूर्ण बैठक

इंडिया आघाडीला शह देण्यासाठी एकीकडे केंद्र सरकारने नवा डाव टाकला आहे. येत्या १८ सप्टेंबरपासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनाची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे या अधिवेशन काळात कोण-कोणती विधेयकं मांडली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

येत्या काळात ‘एक देश, एक निवडणूक’ हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी मोदी सरकारकडून प्रयत्नही करण्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीत इंडिया आघाडीची रणनीती ठरवली जाणार आहे.

India Alliance News
BJP Former MP-MLA Will Join NCP: एकनाथ खडसे देणार भाजपला दणका; माजी खासदार, माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दुसरीकडे काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी मंगळवारी पक्षाच्या नेत्यांची विशेष बैठक बोलावली आहे. त्यामध्ये सोनिया गांधी लोकसभेच्या अधिवेशन काळात काँग्रेसकडून घेण्यात येणाऱ्या भूमिकेची माहिती देण्याची शक्यता आहे. त्याशिवाय काँग्रेसच्या नेते मते जाणून घेऊन पक्षाची रणनीती ठरविणार असल्याचे समजते. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com