कोरोना लशीचे दोन डोस घेतलेत, आता तिसराही घ्यावा लागणार! एम्सच्या प्रमुखांचा दावा

जगभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध लशींचे दोन डोस दिले जात आहे. पण आता कोरोनापासून बचावासाठी तिसरा डोस घ्यावा लागण्याची चिन्हे आहेत.
AIIMS Chief Randeep Guleria
AIIMS Chief Randeep Guleria File Photo

पुणे : जगभरात कोरोनाचा (Covid-19) संसर्ग रोखण्यासाठी विविध लशींचे दोन डोस (Covid Vaccine) दिले जात आहे. पण आता कोरोनापासून बचावासाठी तिसरा डोस (Third Dose) घ्यावा लागण्याची चिन्हे आहेत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (AIIMS) प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनीच याबाबत इशारा दिला आहे. पुढील वर्षी तिसरा डोस घ्यावा लागू शकतो, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ.गुलेरिया म्हणाले की, पुढील वर्षी कोरोमा लशीचा बूस्टर डोस आपल्यासाठी आवश्यक ठरू शकतो. पहिल्या दोन डोसच्या माध्यमातून रुग्णालयात दाखल होणे आणि मृत्यू यापासून किती काळ संरक्षण मिळते हे पाहून तिसऱ्या डोस घ्यावा लागेल. अमेरिका, इस्राईल, ब्रिटन, युरोपीय समुदाय आणि संयुक्त अरब आमिरातीने तिसऱ्या डोसला परवानगी दिली आहे. ही परवानगी आधीच्या दोन डोसमुळे किती काळ कोरोना संसर्गापासून संरक्षण मिळते यावर त्यांनी दिली आहे. यासाठी त्यांनी अँडीबॉडींचा विचार केलेला नाही.

लहान मुलांना कोरोना लस देण्याचे डॉ.गुलेरिया यांनी समर्थन केले. ते म्हणाले की, अमेरिकेप्रमाणे आपल्या देशातही मुलांना कोरोना लस द्यायला हवी. लवकरच हे लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे.

कोविशिल्ड लशीचे उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिटूयटचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी तिसरा डोसही घ्यावा लागणार असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी केला होता. माझ्यासह कंपनीतील कर्मचाऱ्यांनीही तिसरा डोस घेतल्याची कबुली देत त्यांनी इतरांनाही तिसरा डोस घ्यावाच लागेल, असे म्हटले होते. भारतात सध्या कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन यांसह पाच लशी उपलब्ध आहेत. यापैकी कोणतीही लस घेतली तरी त्याचे दोन डोस घ्यावे लागतात. दुसरा डोस बूस्टर डोस म्हणून गृहित धरला जातो. पण पूनावाला यांनी आता तिसरा डोसही घ्यावा लागणार असल्याचं म्हटले होते. लशीमुळे शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीचे प्रमाण काही दिवसानंतर कमी होत जात असल्याचे एका अभ्यासात समोर आलं आहे.

AIIMS Chief Randeep Guleria
कंगनाला दणका! न्यायालयावर अविश्वास दाखवणं पडलं महागात

याविषयी पूनावाला म्हणाले होते, सहा महिन्यांनी लशीची क्षमता कमी होत आहे, हे खरं आहे. पण त्याच्या मेमरी सेल राहतात. पण आजाराला रोखण्यासाठी सहा महिने कमी पडतात. त्यामुळं लशीचा तिसरा डोस घ्यावा लागेल. तो बुस्टर डोस असेल. मी डोस घेतला असून कंपनीतील सात ते आठ हजार कामगारांना दिला आहे. दुसऱ्या डोसनंतर सहा महिन्यांनी तिसरा बुस्टर डोस घ्यायलाच हवा. त्यानंतर काय करायचे, याचा अभ्यास करायला हवा, असंही पूनावाला यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com