मोठी बातमी : चिदंबरम पिता-पुत्राला न्यायालयाकडून समन्स

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (cbi) यांनी भष्ट्राचाराप्रकरण सादर केलेले आरोपपत्र आणि सक्तवसुली संचलनालयाकडून ईडीनं (ED)आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सादर केलेल्या आरोपपत्रानुसार हे समन्स बजावण्यात आल्याचे समजते.
मोठी बातमी : चिदंबरम पिता-पुत्राला न्यायालयाकडून समन्स
Published on
Updated on

नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम ( P Chidambaram)आणि त्यांचे पुत्र खासदार कार्ति चिदंबरम यांच्या विरोधात समन्स बजावण्यात आले आहे. दिल्ली न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एम.के. नागपाल यांनी हे समन्स चिदंबरम यांना दिले असून त्यांना २० डिसेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (cbi) यांनी भष्ट्राचाराप्रकरण सादर केलेले आरोपपत्र आणि सक्तवसुली संचलनालयाकडून ईडीनं (ED)आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सादर केलेल्या आरोपपत्रानुसार हे समन्स बजावण्यात आल्याचे समजते. याप्रकरण सर्व तपासयंत्रणांची बाजू समजून घेतल्यानंतर न्यायालयाने याबाबतचा निर्णय राखून ठेवला होता.

याप्रकरणातील तपास यंत्रणाच्या मतानुसार, काही महत्वपूर्व माहितीसाठी ब्रिटेन आणि सिंगापूर येथे पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यातून महत्वाची माहिती हाती लागली आहे. त्यामुळे चिदंबरम यांची चैाकशी करण्यात येत आहे. चिदंबरम हे अर्थमंत्री असतानांचे हे प्रकरण आहे.

मोठी बातमी : चिदंबरम पिता-पुत्राला न्यायालयाकडून समन्स
ठाकरे सरकार पुरुन उरलं..भाजप दिशाहीन झालाय!

आपल्या पदाचा गैरवापर करुन त्यांनी काही जणांशी करार केला होता. त्यामुळे संबधितांचा त्याचा लाभ झाला. त्यांनी ३०५ कोटी रुपयांचा विदेशी निधी मिळण्यासाठी गैरप्रकार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

इलेक्ट्रिक गाडी खरेदी करताय? नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. यामुळे मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले आहे. यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी महागाईचा भडका कायम आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढू लागला आहे. आता इलेक्ट्रिक वाहनांबाबत केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठी घोषणा केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती जास्त आहेत. त्यामुळे ती खरेदी करणे नागरिकांना परवडत नाही. यावर बोलताना गडकरी म्हणाले की, भारत आता इलेक्ट्रिक वाहनांच्या क्रांतीजवळ पोचला आहे. पुढील दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत पेट्रोल वाहनांच्या किमतीपर्यंत घट होईल. सध्या इलेक्ट्रिक वाहनांवर केवळ ५ टक्के जीएसटी लावला जात आहे. लिथियम आयन बॅटरींची किंमतही आता कमी होऊ लागली आहे. सर्व पेट्रोल पंपांनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स बसावावीत यासाठी सरकारने आधीच धोरणही आखले आहे. पुढील दोन वर्षांत देशात चार्जिंग पॉईंट मोठ्या प्रमाणात वाढतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com