IPS अधिकाऱ्याला विमानतळावर बॅग उघडायला लावली अन् असं काही दिसलं की...

सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळांवर प्रवाशांकडील बॅगांची कसून तपासणी केली जाते. यातून कुणाचीच सुटका होत नाही. संशयित प्रवाशांवर तर करडी नजर असते.
IPS Arun Bothra
IPS Arun BothraSarkarnama

जयपूर : सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळांवर (Airport) प्रवाशांकडील बॅगांची कसून तपासणी केली जाते. यातून कुणाचीच सुटका होत नाही. संशयित प्रवाशांवर तर करडी नजर असते. जयपूर विमानतळावर (Jaipur Airport) अशाच एका आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांकडे सुरक्षा अधिकाऱ्यांची नजर जाते. कदाचित स्कॅनरमध्ये काही संशयास्पद दिसले असावे म्हणून त्यांना बॅग उघडण्यास सांगितले जाते. पण बॅगेत जे काही दिसले त्यावरून विमानतळावर नव्हे तर सोशल मीडियातच (Social Media) धुमाकूळ घातला आहे.

कारणही तसंच आहे. ही बॅग मटारने भरलेली होती. ओडिशातील आयपीएस अधिकारी अरूण बोथरा (Arun Bothra) यांनी याबाबत ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. बोथरा यांनी गंमतीने हे पोस्ट केली आहे की नाही, याबाबत स्पष्टता नसली तरी ही पोस्ट सोशल मीडियात तुफान व्हायरल झाली आहे. बोथरा यांनी मटारने भरलेल्या बॅगेचा फोटो ट्विट केला आहे. त्यावर त्यांनी 'जयपूर विमानतळावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी माझी बॅग उघडायला सांगितले होते,' असं कॅप्शन दिलं आहे.

IPS Arun Bothra
पुतीन यांना मनोरुग्ण म्हटलेल्या 23 वर्षीय मॉडेलचा मृतदेह सापडला बॅगेत

बोथरा हे ओडिशात परिवहन आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. प्रति किलो चाळीस रुपये किलो दराने 10 किलो मटार घेतल्याचे बोथरा यांनी ट्विटरवर आलेल्या एका प्रतिक्रियेवर उत्तर देताना म्हटलं आहे. अनेक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांसह नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत सुमारे 58 हजार जणांनी ही पोस्ट लाईक केली असून साडे तीन हजार शेअर्स आहेत. तर तब्बल तीन हजार प्रतिक्रिया आल्या आहेत.

आयएएस अधिकारी अवनिश शरण यांनी त्यांच्या स्वत:चा अनुभव शेअर केला आहे. 'घरी येत असताना भोपळा आणि वांग्यासाठी मी विमानतळावर इंडिगोला दोन हजार रुपये दिले होते,' असं शरण यांनी सांगितलं. तर प्रविण कासवान या आयएफएस अधिकाऱ्याने 'मटर स्मग्लिंग' असं ट्विट करत खिल्ली उडवली आहे. आयएएस प्रियांका शुक्ला यांनी 'मटर ऑफ ग्रेव्ह कन्सर्न' असं म्हटलं आहे.

काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे की, विमानतळावर त्यांना सांगा की मटारमध्ये डॅग्ज आहे, यानिमित्ताने मटार सोलून होतील. अशा अनेक गंमतीशीर प्रतिक्रिया आल्या आहेत. बोथरा यांच्याकडून विविध मुद्यांवरून ट्विटवर प्रतिक्रिया दिली जाते. त्यांचे जवळपास सव्वा दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

काश्मीर फाईल्स या चर्चेत असलेल्या चित्रपटावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विवेक अग्निहोत्रीचे माहिती नाही, पण देशातील लाको लोक काश्मीरी पंडितांसाठी न्याय मागत आहेत. चित्रपटाचा एवढा तरी उपयोग झाला आहे, असं ट्विट बोथरांनी तीन दिवसांपूर्वी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com