अखिलेश यादवांचे 'मेला होबे'! BJP ला चितपट करण्यासाठी बंगालच्या धर्तीवर प्लॅन

UP Election 2022 : #मेला_होबे हा हॅशटॅग ट्रेंडिंगला
Akhilesh Yadav with many ministers
Akhilesh Yadav with many ministers Sarkarnama
Published on
Updated on

लखनौ : उत्तरप्रदेशच्या निवडणुकांचे बिगूल वाजल्यापासून राजकीय आखाडा चांगलाच तापू लागला आहे. काँग्रेस (Congress), समाजवादी पक्ष(Samajwadi Party), बसपा (BSP) असे सगळे पक्ष भाजपला धुळ चारुन सत्तेतून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर पुन्हा सत्ता राखण्यासाठी भाजपने आपली संपुर्ण ताकद पणाला लावली आहे. अशातच समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी भाजपला चितपट करण्यासाठी पश्चिम बंगालच्या (West Bangel) धर्तीवर प्लॅन आखला आहे. मेला होबे.

पश्चिम बंगालमध्ये गतवर्षी विधानसभा निवडणूक पार पडली. यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि तृणमूल काँग्रेसने 'खेला होबे' अशी राजकीय घोषणा देत निकालात भाजपला चितपट केले. ममतांची ही घोषणा देशभरात चांगलीच लोकप्रिय झाली होती. त्यानंतर आता त्याच धर्तीवर उत्तरप्रदेशमध्ये माजी मुख्ममंत्री अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षाने उत्तरप्रदेश निवडणुकीत भाजपला चितपट करण्यासाठी 'मेला होबे' ही घोषणा तयार केली आहे.

अखिलेश यादव यांच्या ट्विटर हॅन्डेलवर देखील मागच्या काही दिवसांपासून #मेला_होबे हा हॅशटॅग ट्रेंडिंगला आहे. 'मेला होबे' याचा अर्थ खुद्द अखिलेश यादव यांनीच स्पष्ट केला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, यावेळी उत्तरप्रदेशमध्ये सर्व शोषित, वंचित आणि उपेक्षित वर्गाला एकत्रित करुन त्यांचा मेळा होणार आहे. भाजपच्या ध्रुविकरणाच्या आणि अपमानास्पद राजकारणाच्या विरोधात समाजवादी पक्ष सगळ्यांना सोबत घेवून जाणारे आणि सन्मानपुर्वग वागणूक देणारे राजकारण करणार आहे. २०२२ मध्ये सगळ्यांच्या एकत्रित येण्याने सकारात्मक राजकारणाचा ‘मेला होबे’!भाजपचा ऐतिहासिक पराभव होणार.

Akhilesh Yadav with many ministers
अजित पवारांच्या नंबरवरुन २० लाखांच्या खंडणीची मागणी : बिल्डरच्या तक्रारीने खळबळ

दुसरीकडे उत्तरप्रदेशच्या राजकारणात भाजपला मोठी गळती लागली आहे. धक्क्यांवर धक्के देत मंत्री राहिलेल्या स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Morya) यांच्यापासून भाजपच्या आमदारांनी धडाधड पक्षत्याग सुरू केला आहे. आतापर्यंत ३ मंत्री व १४ आमदारांनी भाजपला टाटा केला असून ही यादी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २० तारखेपर्यंत जवळपास १०० आमदार पक्ष सोडणार असल्याचे भाकित या पक्ष सोडलेल्या बंडखोर आमदारांनी वर्तवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com