उत्तर प्रदेशातील पराभवावर अखिलेश यादवांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, काही दिवसांत...

त्तर प्रदेशात भाजपने पुन्हा सत्ता मिळवत इतिहास घडवला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपला करिष्मा दाखवत विरोधकांना धूळ चारली.
Akhilesh Yadav News | UP Election result 2022 news updates | Akhilesh Yadav's first reaction on UP election results
Akhilesh Yadav News | UP Election result 2022 news updates | Akhilesh Yadav's first reaction on UP election results sarkarnama

मुंबई : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी आपला करिष्मा दाखवत विरोधकांना धूळ चारली. भाजप व मित्रपक्षांनी मिळून 273 जागांवर विजय मिळवत इतिहास घडवला. पण समाजवादी पक्षानेही (Samajwadi Party) जोरदार लढत देत भाजपच्या जागा कमी केल्या आहेत. या पराभवानंतर पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. (UP Election result 2022 news updates)

उत्तर प्रदेशचे निकाल पाहिले तर भाजपला एकट्या अखिलेश यादव यांनीच टक्कर दिल्याचे दिसते. इतर पक्षांना मागील निवडणुकीतील जागाही टिकवता आलेल्या नाहीत. या निवडणुकीत एनडीएच्या 39 जागा कमी मिळाल्या आहेत. सपा आघाडीला 125 जागा मिळाल्या असून मागील निवडणुकीच्या तुलनेत तीनपट वाढ झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस व बसपाची धुळधाण झाली आहे. बसपला केवळ एक आणि काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहेत.

Akhilesh Yadav News | UP Election result 2022 news updates | Akhilesh Yadav's first reaction on UP election results
राजनाथसिंह यांच्या मुलाने मोडला अजितदादांचा बारामतीतील विक्रम!

अखिलेश यादव यांनी शुक्रवारी सकाळी ट्विट करत निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आमच्या जागांमधील अडीच पट तर मतांमध्ये दीड पट वाढ झाली आहे. आम्ही दाखवून दिले की, भाजपच्या जागा कमी करू शकतो. हे यापुढे सुरू राहील. भाजपकडून पसरवलेला भ्रम अर्ध्याहून अधिक कमी झाला असून बाकी काही दिवसांत कमी होईल. जनहितासाठी संघर्ष सुरूच राहील, असं अखिलेश यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांच्या विक्रमाची चर्चा

उत्तर प्रदेशात भाजपचे उमेदवार पंकज सिंह (Pankaj Singh) यांचा विजय अन् महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बारामतीतील (Baramati) विक्रमाची चर्चाही होत आहे. पंकज सिंह यांनी नोएडा मतदारसंघात तब्बल एक लाख 81 हजार 513 मताधिक्याने विजय मिळवला आहे. ते केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह (Rajnath Singh) यांचे पूत्र आहेत. पंकज यांना 2 लाख 44 हजार 319 मतं मिळाली आहेत. तर त्यांच्याविरोधात उभे असलेले समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला 62 हजार 806 मतं मिळाली. एकूण मतदानाच्या 70 टक्के मतं एकट्या पंकज सिंह यांना मिळाली आहेत.

Akhilesh Yadav News | UP Election result 2022 news updates | Akhilesh Yadav's first reaction on UP election results
भाजपला मोठा धक्का : यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा पराभव!

पंकज सिंह यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम केलला आहे. त्याआधी हा विक्रम अजित पवार यांच्या नावावर होता. अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात भाजपचे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचा तब्बल 1 लाख 65 हजार मतांनी पराभव केला होता. या विजयाची राज्यभर चर्चा झाली होती. हा विक्रम पंकज सिंह यांनी मोडला आहे. याची चर्चा उत्तर प्रदेशातही रंगली आहे.

दिल्ली भाजपचे उपाध्यक्ष व उत्तर प्रदेशातील बुलंदशहर विभागाचे प्रभारी सुनिल यादव यांनीही याबाबतचे ट्विट केले आहे. पंकज सिंह यानी विधानसबा निवडणुकीत 1 लाख 75 हजार मताधिक्याने विजय मिळत महाराष्ट्रातील अजित पवार यांचं एक लाख 65 हजार मताधिक्यांचा विक्रम मोडत ऐतिहासिक विजय मिळवला आहे, असं यादव यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com