Amit Shah on Congress : 'पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याच्या वक्तव्याने हे स्पष्ट झाले की...' ; अमित शाहांचा काँग्रेसवर निशाणा!

Amit Shah on Artical 370 : पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी कलम 370बाबत केलेल्या वक्तव्यावरून जम्मू-काश्मीरमधील राजकीय वातावरण अधिकच तापलेलं आहे.
amit shah
amit shahsarkarnama
Published on
Updated on

Amit Shah reaction on Pakistan Defense Minister statement : पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले की कलम 370 पुन्हा लागू करण्याबाबत पाकिस्तान काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या सोबत आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, आम्ही कलम 370बाबत काँग्रेस आघाडीच्या भूमिकेशी सहमत आहोत. यानंतर आता भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका सुरू केली आहे.

गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी म्हटले आहे की, 'पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या कलम 370 आणि 35A बाबत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या भूमिकेला समर्थन असल्याच्या वक्तव्याने पुन्हा एकदा काँग्रेसला एक्सपोज केले आहे. या विधानाने पुन्हा हे स्पष्ट केलं आहे की, काँग्रेस आणि पाकिस्तानचे हेतू आणि धोरण एकच आहे. मागील काही वर्षांपासून राहुल गांधी देशवासीयांच्या भावना दुखावत, प्रत्येक भारतविरोधी शक्तीच्यासोबत उभा आहेत.'

amit shah
Pakistan on Article 370 : काँग्रेस - नॅशनल कॉन्फरन्सने 'कलम-370'बद्दल घेतलेल्या भूमिकेचे पाकिस्तानकडून समर्थन!

याशिवाय, 'एअर स्ट्राइक आणि सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागणे असो किंवा मग भारतीय सैन्याबाबत आक्षेपार्ह विधानं करणं असो. राहुल गांधींची(Rahul Gandhi) काँग्रेस पार्टी आणि पाकिस्तानचे सूर नेहमीच एक राहिलेले आहेत आणि काँग्रेसचा हात केवळ देशविरोधी शक्तींसोबत राहिला आहे. परंतु काँग्रेस पक्ष आणि पाकिस्तान हे विसरतोय की केंद्रात मोदी सरकार आहे, त्यामुळे काश्मीरमध्ये कलम 370 आणि दहशतवाद परत येणार नाही.' असंही अमित शाह म्हणाले आहेत.

amit shah
Narendra Modi : पाकिस्तानकडून काँग्रेस-NC ची पोलखोल! पंतप्रधान मोदींचा जोरदार प्रहार

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनीही काँग्रेसवर टीका केली आहे. कटरा येथील प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी काँग्रेस-एनसीचे उघडपणे समर्थन केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, कलम 370 आणि 35 ए बाबत काँग्रेस आणि एनसीचा आणि पाकिस्तानचा अजेंडा सारखाच आहे. म्हणजेच काँग्रेस-एनसीची पाकिस्ताननेच पोलखोल केली आहे. शेजारचा देश त्यांच्याबाबतीत उत्साही आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com