Amit Shah warning : आधीच धास्तावलेल्या पाकिस्तानाला आता अमित शहांचाही कडक अन् सूचक इशारा, म्हणाले...

India's strong warning to Pakistan and terrorists : भारताकडून दररोज पाकिस्तानविरोधात विविध कडक पावलं उचलली जात आहेत.
Union Home Minister Amit Shah addressing a press conference, issuing a stern and symbolic warning to Pakistan and terrorist groups after the Pahalgam terror attack.
Union Home Minister Amit Shah addressing a press conference, issuing a stern and symbolic warning to Pakistan and terrorist groups after the Pahalgam terror attack. sarkarnama
Published on
Updated on

Amit Shah Responds Firmly to Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारताने दहशतवाद संपवण्यासाठी कंबर कसली आहे. शिवाय, पाकिस्तानाविरोधातही विविध कठोर निर्णय घेतले जात आहेत. या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांसह पाकिस्तानला, कल्पनाही केली नसेल असं प्रत्त्युत्तर दिलं जाईल. असा इशारा दिलेला आहे.

त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही प्रत्येक दहशतवाद्यास मारलं जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही, असा सूचक इशारा दिला आहे. एकूण भारताने घेतलेल्या कडक भूमिकेमुळे दहशतवाद्यासोबतच पाकिस्तानलाही चांगलीच धडकी भरलेली आहे.

Union Home Minister Amit Shah addressing a press conference, issuing a stern and symbolic warning to Pakistan and terrorist groups after the Pahalgam terror attack.
Pakistan's nuclear attack threat : पाकिस्तान भारतावर अणुहल्ला करू शकतो का?; नियम काय आहेत अन् किती विनाश होईल?

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी म्हटले की, दहशतवाद्यांनी असा विचार करू नये की त्यांनी युद्ध जिंकले आहे. तर दहशत पसरवणाऱ्या सर्वांना मी सांगू इच्छितो की प्रत्येकाला योग्य उत्तर दिले जाईल आणि जाबही विचारला जाईल. कुणालाही सोडलं जाणार नाही.

Union Home Minister Amit Shah addressing a press conference, issuing a stern and symbolic warning to Pakistan and terrorist groups after the Pahalgam terror attack.
Caste census India : स्वातंत्र्यानंतर जातनिहाय जनगणना का थांबली अन् आता ती का आहे आवश्यक?

९०च्या दशकापासून काश्मिरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता धोरण अवलंबवलेले आहे. एखादं भ्याड कृत्य करून जर कुणाला वाटत असेल की त्यांचा विजय झाला, तर मी त्यांना सांगू इच्छितो की कुणालाच सोडलं जाणार नाही. देशाच्या प्रत्येक इंच जमिनीवरून दहशतवाद नष्ट केला जाईल. जोपर्यंत दहशतवाद संपणार नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. ज्यांनी कोणी हे कृत्य केले आहे त्यांना योग्य दंड दिला जाईल.

भारताकडून पाकिस्तानविरोधात विविध कडक पावलं उचलली जात आहेत. त्यात आता भारताने अणवस्त्र हल्ल्याची बाता मारणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनाही चांगलाच झटका दिला आहे. कारण, भारताने ख्वाजा आसिफ यांचे एक्स अकाउंट भारतात बॅन केलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com