Madhya Pradesh Election : 'किंमत कितीही वाढली तरी सिलिंडर ४५० रुपयांनाच मिळेल', शाहांचे मध्य प्रदेशमध्ये आश्वासन

Amit Shah News : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.
Amit Shah News
Amit Shah News Sarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh Assembly Election : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपकडून जोरदार प्रचार सुरू आहे. त्यातच भाजपचे (BJP) सरकार मध्य प्रदेशात पुन्हा आल्यास घरगुती गॅस सिलिंडर 450 रुपयांना उपलब्ध करून दिला जाईल, असेही आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले.

अमित शाह (Amit Shah) यांची शनिवारी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमित शहा म्हणाले, "जल जीवन मिशन अंतर्गत 65 लाख कुटुंबांना पाणीपुरवठा केला आहे." आयुष्मान योजनेंतर्गत 3.70 लाख लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्यात आले. आता पुन्हा भाजपचे सरकार आल्यास 5 लाखांऐवजी 10 लाखांचे उपचार मोफत होणार आहेत. 80 लाख गरीब लोकांसाठी शौचालये बांधली. 5 कोटी गरीबांना दरमहा 5 किलो धान्य दिले आहे.

Amit Shah News
Loksabha Election: काँग्रेस, भाजप विधानसभा निवडणुकीत व्यस्त; आरक्षणावरून लोकसभेसाठी नितीश कुमारांची आघाडी

अमित शाह म्हणाले, आता मोदीजींनी घोषणा केली आहे की 2024 मध्ये भाजपचे सरकार आले तर पुढील पाच वर्षे अन्नधान्य मोफत मिळेल. किंमत वाढली तरी सिलिंडर 450 रुपयांना मिळेल. "उज्ज्वला योजनेअंतर्गत 82 लाख भगिनींना फायदा झाला. दरम्यान, गॅसचे दर वाढले. पुन्हा भाजपचे सरकार आल्यास गॅसचे दर कितीही वाढले तरी सिलिंडर 450 रुपयांनाच देणार आहे. आम्ही डीबीटीद्वारे 36 लाख लोकांसाठी घरे बांधली, असल्याचेही त्यांनी सांगितले.

''मोदी सरकारने कोव्हिड विरुद्ध लढण्यासाठी सर्वांना मोफत लस दिली आहे. 200 कोटी लसी देऊन लोकांना कोरोनापासून वाचवण्याचे काम मोदीजींनी केले आहे. भाजपने शनिवारी आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Amit Shah News
PM Narendra Modi Rally: पंतप्रधान मोदींसमोरच तरुणी चढली विजेच्या टॉवरवर; अन्...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com