सहकारी बॅंकेच्या ग्राहकांसाठी अमित शहांची मोठी घोषणा

Co-Oprative Banking | Amit Shah| बँकिंग क्षेत्रात पूर्वीपेक्षा आता जास्त सुधारणा झाल्यामुळे नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे बँकिंग सेवेचा लाभ मिळणार आहे.
Amit Shah
Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Amit Shah नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी बॅंक ग्राहकांसाठी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. आता सहकारी बँकेच्या ग्राहकांना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. यासाठी सरकार सहकारी बँकांना डायरेक्ट बँक ट्रान्सफर (DBT) शी जोडले जाईल. एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली.

बँकिंग क्षेत्रात पूर्वीपेक्षा आता जास्त सुधारणा झाल्यामुळे नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे बँकिंग सेवेचा लाभ मिळणार आहे. सध्या केंद्र सरकारच्या 52 मंत्रालयांमार्फत चालू असणाऱ्या तीनशे योजनांचा लाभ डीबीटीद्वारे लाभार्थ्यांना मिळत आहे. पण आता या सर्व योजनांचा लाभ सहकारी बँकेतील ग्राहकांना मिळणार आहेत.

Amit Shah
देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' विधानाने ठाकरे गटाची हवागुल?

जन, धन योजनेमुळे 45 कोटी नवीन लोकांनी बँक खाते उघडले असल्याने त्याचा फायदा थेट बँक ग्राहकांना मिळणार आहे. सरकारच्या नव्या निर्णयामुळे सुमारे 32 कोटी लोकांना रुपे डेबिट कार्डचा लाभ मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यामुळे ‘सहकार से समृद्धी का संकल्प’मुळेच हा लाभ झाला आहे, असंही यावेळी अमित शहा यांनी सांगितलं.

बँकेच्या या योजनेविषयी बोलताना अमित शहा म्हणाले की, देशाच्या समृद्धी आणि आर्थिक उन्नतीत सहकार क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यासोबतच आरबीआय आणि नाबार्डने बँकिंगसाठी तयार केलेल्या सर्व मापदंडांवर कृषी बँकांनी स्वतःला आता सिद्ध केले आहे. पूर्वी बँकांकडून 12 ते 15 टक्के व्याजाने कर्ज मिळत होते, आता ते 10 टक्क्यांवर आले आहे.

पीएम जन धन योजनेंतर्गत नव्याने उघडण्यात आलेल्या कोट्यवधी खात्यांचे डिजिटल व्यवहारही एक ट्रिलियन डॉलर्सपेक्षाही वाढले आहेत. 2017-18 या वर्षातील डिजिटल व्यवहारांच्या तुलनेत यात 50 पटीने वाढ झाली आहे. डीबीटीशी सहकारी बँका जोडल्या गेल्याने नागरिकांशी अधिक संपर्क वाढून आणि सहकार क्षेत्राला अधिक बळकटी मिळणार असल्याचंही अमित शहांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com