मोदी-शहांना आव्हान दिल्यानंतर अमेरिकन टेनिसपटू म्हणाली, गप्प बसणार नाही!

शहा यांनी केलेल्या मोदींच्या कौतूकाला मार्टिनाने जोक म्हटलं आहे.
Martina Navratilova trolls on Social Media.
Martina Navratilova trolls on Social Media.
Published on
Updated on

नवी दिल्ली : अमेरिकेतील प्रसिध्द टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवा (Martina Navratilova) हिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) यांना आव्हान दिलं आहे. मोदी हे हुकूमशहा नव्हे तर सर्वात मोठे लोकशाहीवादी नेते असल्याचं शहा यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. शहा यांनी केलेल्या मोदींच्या कौतूकाला मार्टिनाने जोक म्हटलं आहे. यावरून सध्या ती सोशल मीडियात ट्रोल होत आहे. पण ट्रोल करणाऱ्यांनाही तिने गप्प बसणार नसल्याचे सांगितले आहे.

शहा यांनी एका सरकारी वाहिनी नुकतीच मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी मोदींना हुकूमशहा म्हणणाऱ्या विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं आहे. मोदी यांच्यासारखा लोकशाहीवादी नेता आजपर्यंत भारतात झालेला नाही, असं वक्तव्य शहा यांनी केलं होतं. याबाबतचे एका इंग्रजी वृतसंस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द झालेलं वृत्त मार्टिनाने शेअर करत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शहा यांच्या या वक्तव्याचा उल्लेख तिनं जोक असा केला आहे.

Martina Navratilova trolls on Social Media.
धक्कादायक : समीर वानखेडेंवर ठेवली जातेय पाळत!

मार्टिना नेहमीच आपल्या सडतोड भूमिकांसाठी चर्चेत राहिली आहे. आताही तिने थेट मोदी-शहांना आव्हान दिल्यानं अनेक भारतीय नागरिकांनी तिला ट्रोल केलं आहे. अनेकांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. काही भाजपच्या नेत्यांनीही तिच्यावर टीका केली आहे. तर तिचे चाहते व इतर अनेकांनी तिच्या या भूमिकेचं स्वागतही केलं आहे. मार्टिना हिने काही प्रतिक्रियांना ट्विटवरून उत्तरही दिलं आहे.

एका ट्विटला उत्तर देताना ती म्हणाली आहे की, माझ्या मताशी अनेकजण सहमत नाहीत. मी अमेरिकन महिला असल्यानं काही जण मला गप्प राहण्यास सांगत आहेत. ठीक आहे. पण मी गप्प बसणार नाही, असं म्हणत तिनं आपल्या भूमिकेचं पुन्हा समर्थन केलं आहे. मार्टिना ही जगप्रसिध्द टेनिसपटू असून आतापर्यंत 18 ग्रँडस्लॅम किताब जिंकले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत महिला टेनिसपटू म्हणूनही तिची ओळख आहे.

Martina Navratilova trolls on Social Media.
एअर इंडियाची मालकी टाटांकडे जाताच पंतप्रधान मोदींनी सोडलं मौन; म्हणाले...

काय म्हणाले होते अमित शहा?

अमित शहा यांनी सरकारी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, पंतप्रधानांनी प्रशासनातील अनेक बारकावे समजून घेतले आहेत गुजरातमध्ये भाजपची स्थिती चांगली नसताना त्यांनी पक्षाला उभं केलं. ते सगळ्यांचे मुद्दे ऐकून घेतात. त्यांच्यापेक्षा वयाने, अनुभवाने लहान असलेल्या व्यक्तींच्या सुचनांवरही ते विचार करतात अन् नंतरच निर्णय घेतात. मी त्यांचे काम अत्यंत जवळून पाहिले आहे.

मोदींना विरोधकांकडून हुकूमशहा का म्हटले जाते, यावर बोलताना शहा म्हणाले, हे जाणूनबुजून केलं जात आहे. बैठकीत झालेली चर्चा बाहेर येत नाही. तेव्हा लोकांना वाटते की एकटे मोदीच निर्णय घेतात. जनता आणि पत्रकारांनाही माहिती नसतं, की हे निर्णय सामूहिक चर्चेतून घेतले जातात. आणि स्वाभाविकच आहे, अंतिम निर्णय तर मोदीजीच घेणार आहेत. कारण तसा अधिक जनतेने त्यांना दिला आहे. पण सगळ्यांशी बोलून, प्रत्येकाल बोलण्याची संधी देत, त्यातील नकारात्मक-सकारात्मक बाबींचा विचार करून निर्णय घेतले जातात, असं शहा यांनी नमूद केलं. त्यांच्यासारखा लोशाहीवादी नेता भारतात आजपर्यंत पाहिलेला नाही, असंही शहा म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com