Amritpal Singh Case : पोलिसांना चकविण्यासाठी अमृतपालनं मित्रालाच बनवलं 'बळीचा बकरा'

Panjab Police : १४ व्या दिवशीही पोलिसांकडून अमृतपालची शोधमोहीम सुरू
Amritpal Singh
Amritpal Singh Sarkarnama
Published on
Updated on

Amritpal Singh News : खलिस्तानी प्रचारक आणि 'वारीस पंजाब दे'चे प्रमुख अमृतपाल सिंग याच्या शोधासाठी पंजाब पोलिसांची १४ व्या दिवशीही शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी अमृतपाल सिंगचा साथीदार जोगा सिंग याला अटक केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगा दोन आठवड्यांपूर्वी अमृतपालसोबत पळून गेला होता. त्यानंतर अमृतपालने त्याला त्याचा मोबाईल दिला. 'मोबाईल लोकेशन'मुळे पोलिसांची दिशाभूल होऊ शकते म्हणून जोगाला अमृतपालने मोबाईल घेऊन पळून जाण्यास सांगितले होते. त्यातून जोगाला त्याने बळीचा बकरा बनिवल्याचे उघड झाले.

Amritpal Singh
Navjot Singh Sidhu Release : नवज्योतसिंग सिद्धूंची उद्या होणार सुटका; 'या' प्रकरणात झाली होती एक वर्षाची शिक्षा

लुधियानातील (Panjab) एका ठिकाणावरील 'सीसीटीव्ही फुटेज'मध्ये पोलिसांनी जोगा सिंग दिसला. हे फुटेज २८ मार्चचे आहे. फुटेजमध्ये जोगा एका मोबाईलच्या दुकानात दिसत आहे. येथे त्याने आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडून मोबाईल खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्यासोबत आणखी दोन ते तीन व्यक्ती होत्या.

ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी जोगाची चौकशी केली. अमृतपालने फोन ऑन करून पळून जाण्यास सांगितल्याचे जोगा सिंगने चौकशीदरम्यान सांगितले. अशाप्रकारे अमृतपालने पंजाब पोलिसांपासून वाचण्यासाठी जोगाला फोन चालू करून पळून जाण्यास सांगितले. यातून जोगाला त्याने बळीचा बकरा बनवल्याचे उघड झाले.

Amritpal Singh
Nashik Politics : मेळावा राष्ट्रवादी पक्षाचा; पण पहिल्या स्थानी फोटो झळकला शिंदे गटातील मंत्र्याचा !

दरम्यान, अमृतपाल सिंग (Amritpal Singh) यांनी गुरुवारी एक नवीन व्हिडिओ जारी केला. यामध्ये त्याने शरण येणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. त्याचा हा दुसरा व्हिडिओ आहे. फुटीरतावादी आणि खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग स्वतःला शीख दहशतवादी जर्नेल सिंग भिंद्रनवालेचा अनुयायी असल्याचे सांगतो. १८ मार्च रोजी 'वारीस पंजाब दे' संघटनेच्या सदस्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर तो फरार झाला होता.

अमृतपाल सिंगने गुरुवारी मागावार असलेल्या पोलिसांना चकवा दिला आहे. पोलिसांनी पाठलाग करूनही तो हाती आला नाही. त्यानंतर तो कार सोडून उसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसारा त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान पोलिसानी नेपाळ सरकारलाही अमृतपालबाबत सतर्क राहण्याची विनंती केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com