Andhra Pradesh Election : आंध्रात वातावरण पेटलं; आमदाराने लगावली मतदाराच्या कानशिलात, व्हिडिओ व्हायरल..

Assembly Election : आंध्र प्रदेशातील लोकसभेच्या 25 आणि विधानसभेच्या 175 जागांसाठी आज मतदान होत आहे. आंध्रातील गुंटूर जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मारहाणीचा प्रकार घडला
MLA slap Voter
MLA slap VoterSarkarnama

Andhra Pradesh Political News : देशातील लोकसभेसह आंध्र प्रदेशात आज (ता. १३) विधानसभेसाठी मतदान होत आहे. आंध्रातील सत्ताधारी एका आमदाराने मतदारांना जोरदार मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. रांगेत उभा असलेल्या मतदाराने रांग मोडून पुढे जाणाऱ्यांना मज्जाव केल्याने त्याला मारहाण केल्याची माहिती आहे. याचा व्हिडिओ व्हायरल होत असून या प्रकारावर टीकेची झोड उठली आहे.

आंध्र प्रदेशातील लोकसभेच्या 25 Lok Sabha Election आणि विधानसभेच्या 175 जागांसाठी आज मतदान होत आहे. आंध्रातील गुंटूर जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मारहाणीचा प्रकार घडला. या मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओत तेनालीचे वायएसआर काँग्रेस पक्षाचे आमदार ए शिवकुमार तावातावाने मतदाराकडे गेले आणि त्याच्या तोंडावर ठोसा मारताना दिसत आहेत. त्यावर मतदारानेही त्यांना फटका मारला. त्यानंतर आमदार शिवकुमारांच्या इतर काही सहकाऱ्यांनी मतदारावर हल्ला केला. या दहा सेंकदाच्या व्हिडिओत इतर मतदार त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात. मात्र एकही सुरक्षा कर्मचारी मतदाराच्या मदतीला धावला नसल्याचे दिसत आहे.

या प्रकारावरून वायएसआर पक्षावर विरोधी टीडीपीकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. या मारहाणीच्या घटनेतून सत्ताधारी पक्ष हताश झाल्याचे दिसून येत आहे. मतदारांनी त्यांना आजपर्यंत सहन केले, आता ते त्यांचा मनमानी कारभार सहन करणार नाहीत, हे लक्षात आल्यानेच सत्ताधारी आमदाराने मतदाराला मारहाण केल्याचे टीडीपीच्या प्रवक्त्या ज्योत्स्ना तिरुनागी यांनी सांगितले.

MLA slap Voter
BJP MLA Krishna Khopde : आधी भावनिक केलं नंतर गंडवलं; भाजप आमदार खोपडेंबाबत नेमकं काय घडलं?

टीडीपीच्या आरोपांना वायएसआर काँग्रेस पक्षाचे आमदार अब्दुल हफीज खान यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, व्हिडिओ व्हायरल करून वायएसआर पक्षाच्या बदनामीचा कट आहे. त्यामुळे व्हिडिओचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे. दरम्यान, वायएसआर पक्षानेही आपल्या जखमी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे फोटो पोस्ट करून त्यांना टीडीपीच्या सदस्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. यातून आंध्र प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंध्र प्रदेशात सत्ताधारी वायएसआर काँग्रेस आणि विरोधी टीडीपी या पक्षांमध्ये जोरादार आरोप - प्रत्यारोप झाले आहेत. या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी सत्तास्थापनेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सध्या एक दशकापासून सत्तेवर असलेले मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आपली सत्ता टिकवण्यासाठी तर टीडीपीचे चंद्रबाबु नायडू यांना सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

MLA slap Voter
Maval Lok Sabha Election 2024 : मावळची कमी टक्केवारी बारणेंचे जुने रेकॉर्ड तोडणार का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com