Army bus
Army busANI

जम्मू काश्मीरमध्ये जवानांची बस नदीत कोसळली; सहा जवान शहीद

जखमींना उपचारासाठी श्रीनगर येथील लष्करी रुग्णालयात हलवण्यात येत आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

जम्मू काश्मीर : इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (Police) दलाच्या (ITBP ) ३७ जवानांना घेऊन जाणारी एक बस आज (ता. १६ ऑगस्ट) पहलगाम नदी पात्रात (River) कोसळली. या अपघातात ६ जवान शहीद (martyred) झाले आहेत. इतर ३० जवान आणि दोन रहिवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी श्रीनगर (shrinagar) येथील लष्करी रुग्णालयात हलवण्यात येत आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. (Army bus falls into river in Jammu Kashmir; Six soldiers martyred)

Army bus
‘विनायक मेटेंच्या गाडीचा ३ ऑगस्टलाही दोन गाड्यांनी पाठलाग केला होता’ : मृत्यूचं गूढ वाढलं

हे सर्व ३७ जवान हे अमरनाथ यात्रेच्या ड्यूटीवरून एका बसमधून पहलगामकडे येत होते. त्यावेळी बसचे ब्रेक फेल झाल्याने ती बस पहलगाम नदी पात्रात कोसळली असल्याची प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे. बसमधून आयटीबीपीच्या ३७ जवानांसह दोन रहिवाशीही प्रवास करत होते. ही बस चंदनवारी भागातून पहलगामच्या दिशेने येत होती, त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे. त्यात सहा जवान शहीद झाले आहेत.

ही बस चंदनवारी भागातून जवानांना घेऊन पहलगामच्या दिशेने येत होते. बसमध्ये एकूण ३९ जण होते. पहलगाम परिसरात आल्यानंतर बसचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे ही बस नदीपात्रात कोसळली. आयटीबीपीचे सहा जवान या दुर्घटनेमध्ये शहीद झाले आहेत. या दुर्घटनेमध्ये इतरही काही जवान जखमी झाले आहेत. जखमींना एअरलिफ्ट करून श्रीनगरमधील लष्कराच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात येत आहे.

Army bus
चहा पिण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गाड्यांचा ताफा थांबवला रस्त्यालगतच्या हॉटेलवर!

इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, पहलगामधील झालेल्या अपघातात आमचे ६ जवान शहीद झाले आहेत, ३० जण जखमी झाले आहेत. जखमींना सर्वोत्तम उपचार देण्यात येतील. आयटीबीपी मुख्यालय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. अमरनाथ यात्रेच्या ड्यूटीवरून हे जवान परतत होते. बाधित कुटुंबांना सर्व मदत केली जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com