Kejriwal Vs Modi : अरविंद केजरीवाल यांचे 'या' 10 गॅरंटीतून थेट PM मोदींना चॅलेंज!

Lok Sabha Election 2024 : देशात मोफत वीज, चीनच्या ताब्यातील भूखंड मिळवण्यासह स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना हमीभाव देणे, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणार असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama

Delhi Political News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जामीन मिळाल्यानंतर मोदी सरकारला धारेवर धरले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी रविवारी (ता. 12) आपच्या वतीने दहा प्रकारच्या गॅरंटी जाहीर केल्या आहे. यात दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जासह मोफत वीज आणि सुधारित आरोग्यसेवा आणि सार्वजनिक कल्याणकारी उपक्रमांचा समावेश आहे.

गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी Narendra Modi आपली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. मी दिलेली प्रत्येक गॅरंटी पूर्ण केले असल्याचे ट्रॅक रेकॉर्डने सिद्ध झाले आहे, असे म्हणत केजरीवालांनी आपकडून दहा आश्वासने जाहीर केली आहेत. तसेच 'केजरीवाल गॅरंटी' हवी की 'मोदी गॅरंटी' असा प्रश्न उपस्थित करत केजरीवाल शब्द पाळतात, असेही ते म्हणाले. या गॅरंटीमधून केजरीवाल यांनी सामान्य मतदारांना लक्ष्य केल्याची चर्चा आहे.

वीज

इंडिया आघाडीचे सरकार आले तर देशात 24 तास वीज देऊ. देशात तीन लाख मेगावॅट वीज निर्माण करण्याची क्षमता आहे, पण वापर फक्त दोन लाख मेगावॅट होतो. आपला देश अधिक वीज निर्मिती करू शकतो. जेवढी मागणी आम्ही दिल्ली आणि पंजाबमध्ये केली आहे, ती आम्ही सर्व गरिबांना 200 युनिटपर्यंत मोफत देऊ, त्यासाठी 1.25 लाख कोटी रुपयांची व्यवस्था करू, असे केजरीवाल Arvind Kejriwal यांनी सांगितले.

शिक्षण

सरकारी शाळांमधील शिक्षण सुधारण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केजरीवाल म्हणाले, सरकारी शाळांतील शिक्षण सुधारण्यासाठी पाच लाख कोटी रुपयांची गरज आहे. राज्य सरकार आणि केंद्राने प्रत्येकी अडीच-अडीच लाख कोटी खर्च केला तर ती गरज पूर्ण होऊ शकते. आम्ही सर्वांसाठी उत्तम आणि उत्कृष्ट मोफत शिक्षणाची व्यवस्था करू. सरकारी शाळा खासगी शाळांपेक्षा चांगले शिक्षण देतील, असा शब्दही त्यांनी दिला.

Arvind Kejriwal
Bharati Pawar : दिंडोरीसाठी PM मोदींचा अनोखा संदेश; भारती पवार नेमकं काय म्हणाल्या?

आरोग्यसेवा

आपल्या देशात सरकारी रुग्णालयाची स्थिती चांगली नाही. आम्ही प्रत्येकासाठी चांगल्या उपचारांची व्यवस्था करू. प्रत्येक गावात, प्रत्येक परिसरात मोहल्ला दवाखाने उघडले जातील. जिल्हा रुग्णालयाचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर केले जाईल. या देशात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावर सरकार खर्च करणार आहे, असाही दावा केजरीवाल यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चीनला इशारा

चीनने भारताचा मोठ्या भूखंडावर अतिक्रमण केले आहे. ते मोदी सरकार नाकारत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. ते म्हणाले, भारतीय सैन्यात खूप ताकद आहे. त्यामुळे चीनच्या ताब्यातील आपली जमीन पुन्हा मिळवण्यावर आमचा भर असणार आहे. त्यासाठी एकीकडे मुत्सद्दी पातळीवर तर दुसरीकडे वेळ आली तर लष्कराच्या बळाचा वापराही केला जाईल. तसेच अग्निवीर योजना मागे घेतली जाईल, असेही केजरीवाल म्हणाले.

यासह देशात स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना हमीभाव देणे, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणार असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Arvind Kejriwal
Bharati Pawar : दिंडोरीसाठी PM मोदींचा अनोखा संदेश; भारती पवार नेमकं काय म्हणाल्या?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com