Arvind Kejariwal News : केजरीवालांसाठी इंडिया आघाडी मैदानात; निवडणूक आयोगाची घेतली भेट!

India Alliance in the field Meet The Election Commission : निवडणूक आयोगाने अशा कृत्यांना आळा घालण्याची जबाबदारी पोलिसांकडे दिली आहे.
Arvind Kejariwal News
Arvind Kejariwal NewsSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक झालेले दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. ईडीने केजरीवाल यांना अटक केल्यानंतर आता केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका (PLI) दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, याचे पडसाद आता राष्ट्रीय राजकारणावर उमटले आहेत. सर्वपक्षीयांच्या शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगाची भेट घेऊन याबाबत कारवाई करण्याची विनंती केली आहे. (Latest Marathi News)

निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी म्हणाले, "इथे जवळजवळ प्रत्येक विरोधी पक्ष आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. ही बेकायदशीर कृती करण्यात आली आहे. आम्ही याबाबत निवडणूक आयोगाशी चर्चा केली आहे. हा विषय एका व्यक्तीचा किंवा राज्याचा नाही. कोणाताही पक्ष, संघटना ही संविधानाच्या मूलभूत संरचनेशी संबंधित असतो."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"इथे सर्वांना समान न्यायाची अपेक्षा आहे. मात्र, तपास यंत्रणांचा गैरवापर करून समन्यायाची अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही. अशा गैरप्रकारांचा परिणाम मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांवर होतो. याचा परिणाम आपल्या लोकशाहीवर होतो. निवडणूक आयोगाने अशा कृत्यांना आळा घालण्याची जबाबदारी पोलिसांकडे (Police) दिली आहे. तरीही आम्ही यात आयोगाला हस्तक्षेप करायला लावले, असे सिंघवी म्हणाले.

"स्वतंत्र भारताच्या 75 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. विरोधी पक्षांना गैरप्रकार करून नामोहरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही तपास यंत्रणांच्या विरोधातील गैरप्रकार केल्याचे पुरावे आयोगाला सादर केले आहेत," असेही सिंघवी म्हणाले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com