Arvind Kejriwal : घर देता का घर? अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार, तारीख देखील सांगितली

Arvind Kejriwal will leave the CM residence : अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या मतदारसंघाच्या जवळच घर हवे आहे. कारण त्यांना तेथील लोकांशी संपर्कात राहायचे आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

Arvind Kejriwal News: आम आदमी पक्षाचे प्रमुख, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लवकरच दिल्लीतील मुख्यमंत्री निवासस्थान रिकामे करणार आहेत. ते त्यांच्या नवी दिल्ली मतदारसंघाजवळ नवीन घर शोधत आहेत. अजून त्यांना घर मिळालेले नाही. ते अशा घराच्या शोधात आहेत ज्याच्यावरून कुठला नवीन वाद होणार नाही.

कथित मद्यघोटाळा प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर तुरुंगात बाहेर येताच अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनाम देत अतिशी यांना मुख्यमंत्रि‍पदी देखील नेमले.

ऑक्टोबरचा पहिल्या आठवड्यात नवरात्र उत्सव सुरु होतो आहे. त्याच काळात अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार असल्याचे 'आप'ने दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या मतदारसंघाच्या जवळच घर हवे आहे. कारण त्यांना तेथील लोकांशी संपर्कात राहायचे आहे.

Arvind Kejriwal
Devendra Fadnavis : गृहमंत्री फडणवीस म्हणतात, 'एन्काऊंटर फेक नाहीच, कोर्टाच्या टिप्पणीलाही महत्त्व नाही...’

कार्यकर्त्यांकडून ऑफर

आपने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अरविंद केजरीवला यांना 'आप'चे आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते याशिवाय विविध सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पार्श्वभूमीचे सामान्य लोकही त्यांना त्यांच्या घरी राहण्याची विनंती करत आहेत.

Arvind Kejriwal
Maharashtra Election 2024 : रश्मी शुक्लांविषयी तक्रार मिळाली; कारवाईबाबत निवडणूक आयोगाचं मोठं भाष्य...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com