कार्यालयाला दिला भगवा रंग; काँग्रेसचा सरकारला 36 तासांचा अल्टीमेटम

काँग्रेसचे कार्यालय असलेल्या मार्गावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 तारखेला जाणार आहेत.
Congress Office
Congress OfficeSarkarnama
Published on
Updated on

वाराणसी : उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसकडूनही सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या माध्यमातून ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे राजकीय वादविवादही आता जोरदार सुरू झाले आहेत.

वाराणसीमध्ये (Varanasi) मशिदीला भगवा रंग दिल्यानंतर आता काँग्रेसच्या (Congress) कार्यालयही याच रंगाने रंगवल्याने वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे 13 डिसेंबरपासून दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. विश्वनाथ धामचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी या मार्गावर रंगरंगोटी केली जात आहे. एकतेचा संदेश देण्यासाठी मार्गातील सर्वच इमारतींना हा रंग दिला जात आहे.

मार्गातील मशिदीलाही भगवा रंग दिल्याने वाद निर्माण झाला होता. आता त्यात काँग्रेसचे महानगर कार्यालयही रंगवल्याने वाट पेटला आहे. काँग्रेसने वाराणसी विकास प्राधिकरणाला पत्र लिहून दुसरा रंग देण्यासाठी 36 तासांचा अल्टीमेटम दिला आहे. अन्यथा जोरदार आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Congress Office
भाजप नेत्याला 29 वर्षांपूर्वीचं प्रकरण भोवलं; आमदारकी झाली रद्द

मशिदीला भगवा रंग दिल्यानंतर झालेल्या वादावर तोडगा निघाला आहे. वाद वाढू लागल्यानंतर प्रशासनाने मशिदीला पुन्हा पांढरा रंग दिला आहे. दरम्यान, काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या लोकापर्णावरून काँग्रेसकडून मागील काही दिवसांपासून टीका केली जात आहे. काँग्रेसचे नेते अजय राय म्हणाले होते की, कॉरिडॉरसाठी अनेक झाडे तोडण्यात आली आहे. हे करून सरकार एक आधुनिक मॉलच तयार करत आहे.

Congress Office
साम-दाम-दंड-भेद सर्व करून झालं, पण परबांच्या हाती काही लागेना!

राजकीय मार्केटिंग करून संपूर्ण वाराणशीतील लोकांना भुलवू असं भाजपला वाटत असले. पण काशीची जनता प्रत्येक कणात शंकराची पूजा करते. मॉलमध्ये पूजा करण्यासाठी मोदींना खासदार बनवले नाही. 2022 च्या निवडणुकीसाठी यातून मार्केटिंग होईल, असं भाजपला वाटत असेल. पण येथील जनता खूप नाराज आहे, असंही राय म्हणाले.

काशी विश्वनाथ कॉरिडॉर 5 लाख 27 हजार 739 चौरस फूट जागेवर सज्ज आहे. पंतप्रधान मोदींचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या हस्तेच 13 तारखेला याचे लोकार्पण होणार आहे. तसेच इतर कार्यक्रमांसाठीही ते दोन दिवस वाराणसीमध्ये आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com