Delhi Elections 2025: भाजप, आप, काँग्रेसला ओवेसी, मायवतींचे टेन्शन; मुस्लिम, दलित मतांचा दिल्लीत किती परिणाम होणार

AIMIM and BSP Will Contest in Delhi Assembly Elections 2025 : उत्तर-पूर्वे दिल्लीतील 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. हे मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातील निकालावर दिल्ली कुणाच्या ताब्यात राहणार, हे ठरते.
Delhi Assembly Election 2025
Delhi Assembly Election 2025Sarkarnama
Published on
Updated on

Delhi Elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. आम आदमी पार्टी, बीजेपी आणि काँग्रेस या तीन पक्षात प्रामुख्याने लढत होत असताना तीनही पक्षांची नजर मुस्लिम आणि दलित व्होटबँकवर आहे.

दिल्ली विधानसभेच्या आखाड्यात नशिब अजमावण्यासाठी काही लहान पक्षही उतरत आहेत. उत्तर-पूर्वे दिल्लीतील 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. हे मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातील निकालावर दिल्ली कुणाच्या ताब्यात राहणार, हे ठरते.

या 10 जागा लढण्यासाठी हैदराबादचे खासदारअसदुद्दीन ओवैसी यांची एआईएमआईएम, मायावती यांची बहुजन समाज पार्टी आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचा जनता दल यूनाइटेड (जेडीयू) पक्ष जोरदार तयारी करीत आहे.

2020 झालेल्या दंगलीमुळे उत्तर-पूर्वे दिल्ली जाळपोळच्या मोठ्या घटना घडल्या होत्या. दिल्लीच्या दंगलीत आम आदमी पार्टीचे माजी नगरसेवक ताहिर हुसैन यांच्यावर आरोप करण्यात आले होते.

Delhi Assembly Election 2025
Kolhapur Guardian Minister: कोल्हापुरचा 'वस्ताद' कोण? मुश्रीफ की आबिटकर; रस्सीखेच सुरु...की तिसराच बाजी मारणार?

आम आदमी पार्टीने त्यांना आता मुस्तफाबाद विधानसभेच्या जागेसाठी रिंगणात उतरवलं आहे. एमआयएम दिल्लीत 10 ते 12 जागा लढणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. या सर्व जागा उत्तर-पूर्व दिल्लीतील आहे.

ज्या विधानसभा मतदारसंघात मुस्लिम लोकसंख्या ही 30 टक्के आहे. या जागा एमआयएम लढण्याच्या तयारीत आहेत. लवकरच पक्षाकडून उमेदवाऱ्याची दुसरी यादी जाहीर करण्यात येणार आहे.

Delhi Assembly Election 2025
Dada Bhuse : शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे शिकवणार इंग्रजी शाळांना मराठीचा 'धडा'

मायावतींच्या बहुजन समाज पार्टी दिल्लीतील सर्व 70 जागा लढण्याच्या तयारीत आहे. 1993पासून सलग बसपा दिल्ली विधानसभा लढत आहेत. 2008 मध्ये बदरपुर आणि गोकलपुर या दोन ठिकाणी बसपाने विजय मिळवला होता. त्यांना सुमारे 14 टक्के मते मिळाली होती. पण त्यानंतर पक्षाला फारसे यश मिळाले नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत 71 टक्के मते मिळाली होती.

बसपाची ताकद दिल्लीत कमी होत चालली असली तरी 2015 च्या विधानसभा निवडणुकीत बसपाने 17 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे दिल्लीचे राजकीय ,समीकरणं बदलली होती. आगामी निवडणुकीत आता बसपाने पुन्हा एकदा जोरदार तयारी केली आहे. याशिवाय जेडीयूची नजर दिल्लीच्या पूर्व भागावर आहे. मुस्लिम आणि दलित व्होटबॅंकचं आप, बीजेपी आणि काँग्रेस यांना सत्तेपासून रोखणार की विजयी करणार हे 8 फेब्रुवारीला समजेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com