Asaduddin Owaisi

Asaduddin Owaisi

Sarkarnama

पंतप्रधान मोदी विरुद्ध राज्यपाल वादात आता ओवेसींची उडी

राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यातील वाद उफाळून आला आहे.
Published on

नवी दिल्ली : मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यातील वाद उफाळून आला आहे. आता मलिकांनी मोदींसोबत झालेल्या बैठकीबाबत खळबळजनक दावा केल्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या वादात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनाही ओढले आहे. एका राज्यपालानेच अमित शहांचा हवाला देऊन हा दावा केल्याने याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. या वादात आता एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी उडी घेतली आहे.

मोदींशी भांडण झाल्यानंतर त्यांनी मला अमित शहांना भेटायला सांगितले होते. सांगितल्यानुसार मी शहांना भेटलो. त्यावेळी मोदी हे वेडे झाले आहेत, असे शहा म्हणाले. तुम्ही अजिबात कुणाची काळजी करू नका. तुम्ही नियमितपणे भेटायला येत जा, असेही शहा मला म्हणाले, असे मलिक यांनी सांगिले आहे. मलिक यांनी मोदींनाच वेडे ठरवल्याने खळबळ उडाली आहे. या वादात ओवेसींनी उडी घेत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या भेटीत 500 शेतकऱ्यांचा विषय काढतात मोदी भडकले. यातून हेच सिद्ध होते की त्यांना राज्यपालांकडूनही सत्य ऐकायचे नाही. मग ते सामान्य नागरिकांचे काय ऐकणार? त्यांना केवळ स्वत:चे कौतुक ऐकायचे आहे.

<div class="paragraphs"><p>Asaduddin Owaisi</p></div>
निवडणुकीच्या तोंडावर भाजप अडचणीत! मंत्र्याच्या मुलावर तब्बल 5 हजार पानांचं आरोपपत्र

मलिकांनी हरियाणा येथील दादरीमध्ये एका सामाजिक कार्यक्रमात संवाद साधताना ही माहिती उघड केली आहे. ते म्हणाले की, शेतकरी आंदोलनावरून (Farmers Protest) मी पंतप्रधान मोदींना भेटलो होतो. त्यावेळी पाच मिनिटांच्या आतच आमचा वाद झाला होता. ते खूप अहंकारात होते. मी जेव्हा त्यांना म्हणालो की, 500 लोकांचा मृत्यू झाला आहे. तेव्हा ते म्हणाले, माझ्यासाठी मेले आहेत का?

<div class="paragraphs"><p>Asaduddin Owaisi</p></div>
काँग्रेसचा भाजपला धोबीपछाड! सहाच दिवसांत आमदाराची घरवापसी

मोदींच्या या वक्तव्यानंतर वाद झाल्याचे मलिकांनी सांगितले. तुमच्यासाठी हे लोक मेले आहेत. कारण तुम्हा राजा बनले आहात, असं आपण मोदींना म्हणाल्याचे मलिकांनी सांगितले. यावरून त्यांच्याशी भांडण झाल्याचेही मलिकांनी स्पष्ट केलं आहे. पंतप्रधानांनी त्यानंतर मला अमित शहांना भेटायला सांगितले. मी शहांनाही भेटलो. जेव्हा कुत्रा मरतो तेव्हा पंतप्रधान शोक संदेश पाठवतात. पण शेतकरी मृत्यूवर ते गप्प राहिले, असंही मलिक म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com