Owaisi On One Nation One Election : 'एक देश-एक निवडणूकी'ला ओवेसींचा कडाडून विरोध; म्हणाले, 'निर्णय घटनाविरोधी..'

Asaduddin Owaisi criticize PM Narendra Modi : "कायदेशीर अभ्यास करून विरोध दर्शवणार.."
Owaisi On One Nation One Election :
Owaisi On One Nation One Election : Sarkarnama

New Delhi News : राजधानी नवी दिल्लीत वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. केंद्र सरकारकडून गुरुवारीच संसदेच्या विशेष अधिवेशन बोलविण्याची घोषणा करण्यात आली. त्यासाठी १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान पाच दिवसांचं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. त्यानंतर गुरुवारी रात्री उशीरा तडकाफडकी निर्णय घेत केंद्र सरकारकडून वन नेशन-वन इलेक्शनसाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली. (Latest Marathi News)

Owaisi On One Nation One Election :
J P Nadda Meet President: 'वन नेशन-वन इलेक्शन'ला येणार वेग ? जे. पी. नड्डा यांनी माजी राष्ट्रपतींची घेतली भेट !

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र आता ‘एक देश एक निवडणूक’ हे विधेयक मांडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु असतानाच, आता याला विरोधी पक्षांकडून विरोध होत आहे. या निवडणुका घटनेविरोधात असल्याचे सांगत एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे.

आगामी काळात आम्ही अशा प्रकारच्या निवडणुकांना विरोध करणार असून, याबाबत येत्या काळात कायदेशीर अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर याबाबत आम्ही एक देश-एक निवडणुकीला विरोध करणार आहोत. त्यासाठी लवकरच तयारी सुरुवात करणार आहोत, असेही यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार ओवेसी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता येत्या काळात या निवडणुकीला विरोधकांकडून विरोध करण्यात येणार हे स्पष्ट झाले आहे.

Owaisi On One Nation One Election :
Ajit Pawar ED News: राज्य बॅंकेच्या आरोपपत्रातून अजित पवारांचे नाव वगळलं; पण शिंदे गटाचा एक नेता अडकला

इंडिया आघाडी सध्या मुंबईतील बैठकीत व्यस्त असल्याने अजून त्यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून येत्या काळात 'एक देश एक निवडणुकीला' विरोध करण्यात येणार हे स्पष्ट झाले आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनकाळात एक देश एक निवडणूक’ हे विधेयक मांडून ते पारित करण्याचा प्रयत्न सत्ताधारी एनडीएच्या घटक पक्षाकडून केला जाणार आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या इंडिया आघाडीकडून ही विरोधात काय भूमिका घेतली जाणार आहे, याकडे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com