J P Nadda Meet President: 'वन नेशन-वन इलेक्शन'ला येणार वेग ? जे. पी. नड्डा यांनी माजी राष्ट्रपतींची घेतली भेट !

J P Nadda On One Nation One Election : डिसेंबर पर्यंत देशात एकाच वेळी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होतील का?
One Nation One Election
One Nation One Election Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. नड्डा यांनी कोविंद यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घतली आहे. मोदी सरकारने रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 'एक राष्ट्र, एक निवडणूक' समिती स्थापना केली आहे. यानंतर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅक्शन मोडवरती आल्याने, चर्चांना उधाण आले आहे.

एक देश - एक निवडणुकीसाठी मोदी सरकारकडून समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्याअध्यक्षेतेखीली समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. केंद्र सरकारने 'वन नेशन वन इलेक्शन'चा निर्णय लागू करता येईल का? या संदर्भात शक्यता चाचपण्यासाठी एक समिती नेमली आहे. (Latest Political Marathi News)

One Nation One Election
NCP Crisis News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 'RRR' पक्षाला सुपरहिट करणार का? सभांचा लावणार धडाका..

'एक देश एक निवडणुक' संदर्भाच्या दृष्टीने मोदी सरकाचे हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. ही समिती कायद्यातील सर्व बाबींचा विचार करेल. यामुळे आता एक देश - एक निवडणूक दृष्टीपथात आल्याचे बोलले जात आहे.

One Nation One Election
Rohit Pawar On NCP Crisis : राष्ट्रवादीत वाढतेय रोहित पवारांची 'पॉवर'; विरोधी नेत्यांसोबत भेटीगाठी, सुळेंनी केले 'राष्ट्रीय प्रमोशन' ?

मोदी सरकारच्या या निर्णयामुळे आता मुदतपूर्व निवडणुका होतील का?  लोकसभेचा कार्यकाल पूर्ण होण्याआधीच निवडणुका पार पडणार का? अशा चर्चांना एकच उधाण आले आहे. डिसेंबर पर्यंत देशात एकाच वेळी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होतील का? अशी शक्यताही बोलून दाखवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com