assam cabinet decision minority certificates
assam cabinet decision minority certificatessarkarnama

मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय : 'या' सहा धर्मांना मिळणार अल्पसंख्याक प्रमाणपत्र

राज्य सरकारने याबाबतची तयारी पूर्ण केली आहे. तीन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत या अल्पसंख्याक प्रमाणपत्राबाबत माहिती दिली होती.
Published on

नवी दिल्ली : धर्माच्या आधारावर सहा समुदायांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र (minority certificates) देण्याचा महत्वाचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. लवकरच या सहा धर्मांना हे अल्पसंख्याक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. (Assam Cabinet Decision news)

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंत्री केशव महंत यांनी याबाबत बैठकीत ही घोषणा दिली. लवकरच हे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे महंत यांनी सांगितले.

assam cabinet decision minority certificates
सुप्रियाताईंना 'मसणात जा' म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांचा माफीनामा

राज्य सरकारने याबाबतची तयारी पूर्ण केली आहे. तीन दिवसापूर्वी मुख्यमंत्री हिमंत बिस्मा सरमा यांनी विधानसभेत या अल्पसंख्याक प्रमाणपत्राबाबत माहिती दिली होती.

ते म्हणाले की, अल्पसंख्याकांबाबत जिल्हावार धोरण बदलणे गरजेचे आहे. चहा मळ्याचे मालक हे अल्पसंख्याकामध्ये येत नाही, त्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे. पण ते अल्पसंख्याक म्हणू लाभ घेत आहेत. मुस्लिम, खिश्चन, शिख, बौद्ध, जैन और पारसी यांना अल्पसंख्याक प्रमाण पत्र देण्यात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com