Assam Copy Paste CM video viral: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरुन सध्या राजकारण तापलं असतानाच एका मुख्यमंत्र्यांच्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हिंदी आणि इंग्रजी भाषा व्यवस्थितपणे बोलता येत नसल्याचा हा व्हिडिओ आहे. एका नेटकऱ्यांनं मुख्यमंत्र्यांना यावरुन डिवचल्यानंतर मुख्यमंत्र्यांना नम्रपणे आपल्यातील उणीव मान्य केली आहे. याबाबतचा व्हिडिओवर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या विनम्रतेचं कौतुक केलं आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा हे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात, पण सध्या ते आपल्यातील एका उणीवेमुळे चर्चेत आहे. खूप कमी जणांना माहित आहे की आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना हिंदी आणि इंग्रजी भाषा व्यवस्थित बोलता येत नाहीत. एका व्हिडिओंमुळे हे उघडकीस झाले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
हिमंत बिस्वा सरमा यांनी टि्वट करीत याबाबत खुलासा केला आहे. एका नेटकऱ्याने त्यांना 'कॉपी पेस्ट सीएम' म्हणून हिणवलं होते. "सादर आहे, आसामचे मुख्यमंत्री विना कॉपी पेस्ट एकही पॅराग्राफ व्हिजिटर्स बुकमध्ये लिहू शकत नाहीत," असे सांगत त्याने व्हिडिओ शेअर केला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.
"मी आसामी माध्यमातील शाळेत शिकलो आहे. प्रयत्नपूर्व हिंदी आणि इंग्रजी शिकत आहे. हिंदी आणि इंग्रजी भाषा मला व्यवस्थितपणे समजत नाही. मला हे मान्य करताना यात कमीपणा वाटत नाही, " असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या विनम्रतेचे नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. कमेंट सेक्शनमध्ये "परिपूर्ण उत्तर" असे म्हटलं आहे. "पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी आपल्यातील उणीव मान्य केली आहे. हिंदी व इंग्रजी भाषा शिकण्याचा ते प्रयत्न करीत आहे. हैट्स ऑफ !" असे एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे.
देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर. महाराष्ट्रात असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर हिमंत बिस्वा सरमा यांनी काही महिन्यापूर्वी प्रश्न उपस्थित केला होता. महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचं आसाम सरकारनं म्हटलं आहे. भीमाशंकरचं सहावं ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.