Ayodhya Railway Station : अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलले, आता 'या' नावाने ओळखले जाणार भव्य जंक्शन

Ayodhya Railway Station Gets A New Name : पंतप्रधान मोदींच्या भेटीपूर्वी अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलले...
Ayodhya Dham Junction
Ayodhya Dham JunctionSarkarnama
Published on
Updated on

Ayodhya Railway Station Renamed : अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होण्यापूर्वी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्यात आले आहे. अयोध्या धाम जंक्शन असे नाव दिले गेले आहे. अयोध्येचे भाजप खासदार लल्लू सिंह यांनी बुधवारी ट्विट करून ही माहिती दिली. अयोध्येत येत्या 22 जानेवारीला राम मंदिरात प्राणपतिष्ठा सोहळा होणार आहे. त्यात पंतप्रधान मोदी हे प्रमुख पाहुणे आहेत.

Ayodhya Dham Junction
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच भाजप करणार 150 उमेदवार फायनल; 'या' खासदारांचा होणार पत्ता कट

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनात अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून आता अयोध्या धाम जंक्शन असे करण्यात आले आहे. यासाठी साधू-संत, अयोध्यावासी आणि भालिकांकडून पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गृहमंत्री अमित शाहा, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार, असे अयोध्येचे खासदार लल्लू सिंह यांनी ट्विट करून म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी अयोध्येत येणार

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीच अयोध्येतील वातावरण उल्हासमय झाले आहे. त्यातच पंतप्रधान मोदी हे येत्या 30 डिसेंबरला म्हणजे शनिवारी अयोध्या दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी हे अयोध्येतील नवीन विमानतळ आणि नवनिर्मित केलेल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करणार आहेत. यासोबतच हजारो कोटींच्या योजनांची भेटही जनतेला देणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रोड शोसह सभाही होणार

पंतप्रधान मोदी अयोध्या दौऱ्यात सभेला संबोधित करणार आहेत. यासोबतच त्यांचा अयोध्येत रोड शोही होणार आहे. पंतप्रधान मोदी या दौऱ्यात काही विकास योजनांची घोषणा करणार आहेत. यामुळे पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी आम्ही उत्सुक आहोत, असे अयोध्येतील नागरिकांनी म्हटले आहे.

(Edited by Sachin Fulpagare)

Ayodhya Dham Junction
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील सोहळ्याचे UP वगळता इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाहीच; 'हे' आहे कारण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com