Ayodhya Ram Mandir Inauguration LIVE Updates : देव ते देश अन् राम ते राष्ट्राच्या चेतनेचा विस्तार; नरेंद्र मोदी म्हणाले...

Ayodhya Ram Mandir Inauguration News : राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना विधी संपन्न..
Narendra Modi Speech On Ram Temple :
Narendra Modi Speech On Ram Temple :Sarkarnama
Published on
Updated on

Ayodhya Ram Mandir Inauguration LIVE Updates : देव ते देश अन् राम ते राष्ट्राच्या चेतनेचा विस्तार; नरेंद्र मोदी म्हणाले...

आपल्याला आजापासून एक हजार वर्षांचा सांस्कृतिक पाया रचायचा आहे. नव्या भव्य भारताच्या निर्माणाची शपथ घ्यायची आहे. आपल्या चेतनेचा विस्तार रामपासून राष्ट्रापर्यंत झाली पाहिजे. माता शबरी तर केव्हापासून म्हणत होत्या, 'राम आयेंगे..' हेच तर आहे, देवापासून देश आणि रामापासून राष्ट्रापर्यंतचा चेतनेचा विस्तार. बंधुत्वाची ही भावना भारतात आधार बनेल.

Ayodhya Ram Mandir Inauguration LIVE Updates : भारतीय संप्रदायाच्या अतूट विश्वासाची प्राणप्रतिष्ठा...

आज मी त्या लोकांना आवाहन करतो. जे म्हणत होते, राम मंदीर बनल्यावर आग लागेल. त्यांनी त्यांचे विचार बदलावेत. राम हा विचार आहे. राम आग नाही, राम उर्जा आहे. जे उत्सव भारतात आहे, तशी उर्जा जगातल्या अनेक देशात आहे. रामाच्या रुपात भारतीय संप्रदायाची अतूट विश्वासाची प्राणप्रतिष्ठा आहे, असे मोदी म्हणाले.

Ayodhya Ram Mandir Inauguration LIVE Updates : राम हा भारताचा आत्मा; हजारो वर्षांपर्यंत या क्षणाची नोंद होईल..

Narendra Modi Speech On Ram Temple : प्रभू राम भारताच्या आत्म्यात आहेत. मनामनात राम आहेत. मात्र अनेक वर्ष मंदिराचं काम झाले नाही. आज हा क्षण आपण साजरा करत आहोत, हे आपलं भाग्य आहे. हजारो वर्षानंतरही आजच्या दिवसाची चर्चा होईल. रामाचे आदर्श, राम आदर्श हा देशाचा आधार आहे. रामाच्या या कामात अनेकांनी त्याग आणि पराकाष्ठा केली. सर्व कारसेवकांचे आपण ऋणी आहोत. (Latest Marathi News)

Ayodhya Ram Mandir Inauguration LIVE Updates : आजपासून नव्या कालचक्राचा उगम; राम प्राणप्रतिष्ठेनंतर नरेंद्र मोदींची भावना!

Narendra Modi Speech On Ram Temple : अनेक वर्षांनी राम आले आले आहेत. आता रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत. आजचा दिवसा ही एक तारीख नाही, तर नव्या कालचक्राचा उगम आहे. देश बांधवांमध्ये नवा विश्वास निर्माण होत आहे. गुलामीच्या बेड्यांना तोडून आज नव्या काळात आपण प्रवेश करत आहोत.

Ayodhya Ram Mandir Inauguration LIVE Updates : आज त्रेतायुगात आल्यासारखे वाटते; मुख्यमंत्री योगी भावूक..

Ayodhya Ram Mandir Live : योगी आदित्यनाथ म्हणाले. मन भावूक झाले आहे आणि या क्षणाचे वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत. रामाचे नाव प्रत्येकाच्या मनात आहे. प्रत्येक मार्ग अयोध्येकडे येत आहे. प्रत्येक जिभ राम राम जपत आहे. राम आमच्या रोम रोममध्ये आहे. आपण त्रेतायुगात प्रवेश केले आहे असे वाटत आहे.आज प्रत्येक राम भक्ताच्या मनात अभिमान आणि समाधानाची भावना आहे. या दिवसाच्या प्रतीक्षेत पाचशे वर्षे उलटली. जिथे मंदिर बांधायचा संकल्प केला होता, तिथंच मंदिर बांधलं गेलं याचा आनंद आहे."

Ayodhya Ram Mandir Inauguration LIVE Updates : मोदींना व्हायचे होते निवृत्त, पण.. ; गोविंद गिरी महारांजांनी...

Ayodhya Ram Mandir Live : अयोध्येतील कार्यक्रमात गोविंद गिरीजी महाराज म्हणाले की, 'तुम्हाला पाहिल्यानंतर एकच राजा आठवतो आणि ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.लोकांना माहीत नाही की, पंतप्रधानजी मल्लिकार्जुन दर्शनाला गेले तेव्हा त्यांनी तीन दिवस उपवास केला. त्यावेळी पंतप्रधान म्हणाले की, मला निवृत्त व्हायचे आहे. इतिहासातील ही अत्यंत अनोखी घटना आहे. मंत्र्यांनी त्यांना समजूत घालून पुन्हा त्यांना समजावून परत आणले. आज आपल्याला असेच एक महापुरुष सापडले, ज्यांना हिमालयातून साक्षात भगवती जगदंबा यांनी भारतमातेची सेवा करण्यासाठी मोदींना पाठवले आहे, असे म्हणत देवगिरी भावूक झाले.

Ayodhya Ram Mandir Inauguration LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना; रामलल्ला विराजमान...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठाना सोहळा पूर्ण झाला. जवळपास पाचशे वर्षांच्या हिंदू धर्मीयांची प्रतीक्षा अखेर संपली. रामलल्लाच्या विराजमानाने देशात आनंदाचे वातावरण आहे.

Ayodhya Ram Mandir Inauguration LIVE Updates : पंतप्रधान मोदी अन् मोहन भागवत यांच्या उपस्थितीत विधीला सुरुवात..

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत अयोध्येतील राम मंदिराच्या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठापनेच्या विधीला सुरुवात झाली आहे.

अयोध्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पूजा साहित्य घेऊन आले आहेत. मंदिराच्या गर्भगृहात त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित आहेत. दुपारी 12.29 च्या सुमारास हा सोहळा सुरू होईल.

Ayodhya Ram Mandir Inauguration LIVE Updates :अयोध्येत अंबानी दाम्पत्य दाखल 

Mukesh Ambani And Nita Ambani Arrive At Ram Temple : राम मंदिर सोहळ्यासाठी देशातील मोठे उद्योगपती अंबानी दांम्पत्य दाखल झाले आहे. मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी दाखल झाल्या आहेत.

Ayodhya Ram Mandir Inauguration LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल; सर्वात आधी 'या'ठिकाणी जाणार..

Narendra Modi In Ayodhay : पंतप्रधान नरेंद्र मोदी या क्षणी अयोध्येमध्ये पोहचले आहेत. सर्वप्रथम ते हनुमान गढीकडे जाण्याची शक्यता आहे. तिथे दर्शन घेतल्यानंतर ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्याच्या विधीला सुरूवात करणार आहेत.

Ayodhya Ram Mandir Inauguration LIVE Updates : संरसंघचालक मोहन भागवत अयोध्येत पोहोचले...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत देखील अयोध्येत पोहोचले आहेत. राम मंदिर सोहळ्यात भागवत हे देखील मंदिरात उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10:30 पर्यंत अयोध्येला पोहोचणार आहेत.

Ayodhya Ram Mandir Inauguration LIVE Updates : राम मंदिरात खास आरती; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी..

Ayodhya Ram Mandir LIVE : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. सर्व निमंत्रितांच्या उपस्थितीत आरती होणार आहे. दरम्यान लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून अयोध्या राम मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. कलाकारांकडून विविध भारतीय वाद्ये वाजवण्यात येणार आहे.

Ayodhya Ram Mandir Inauguration LIVE Updates : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत पोहोचले..

Ram Mandir Live : उत्तर प्रदेशातील अयोध्या राम मंदिराच्या सोहळ्याने सजले आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही तास उरले आहेत. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येतील राम मंदिरात पोहोचले आहेत. अयोध्येत पोहोचलेल्या लोकांनी त्यांनी स्वागत केले. रविवारी रात्री कडाक्याच्या थंडीत मुख्यमंत्री आदित्यनाथ तयारीचा आढावा घेण्यासाठी राम मंदिरात पोहोचले होते.

Ayodhya Ram Mandir Inauguration LIVE Updates : बाबरीचे पक्षकार अन्सारी म्हणाले, रामलल्ला दर्शनाला..

बाबरी मशिदीचे पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी लोकांना अयोध्येत जाऊन राम लल्लाचे आशीर्वाद घेण्याचे आवाहन केले आहे. इक्बाल अन्सारी म्हणाले, 'संपूर्ण देश उत्सव साजरा करत आहे. प्रभू रामाचा आशीर्वाद घेण्यासाठी लोकांनी अयोध्येला जावे. आजच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमासाठी ते निमंत्रित अतिथी आहे.

Lal Krishna Advani : मोठी बातमी - लालकृष्ण अडवाणी राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत; काय आहे कारण?

Lal Krishna Advani : उत्तर प्रदेशातील अयोध्येत पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे. निमंत्रित दाखल होत आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी या कार्यक्रमापासून दूर राहू शकतात, अशी शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार अयोध्येतील थंडीची तीव्रता पाहता हा लालकृष्ण अडवाणी येणार नसल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे राम मंदिर आंदोलनातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असलेले अडवाणींचे वय 96 वर्ष आहे.

Glimpses from the puja rituals : अयोध्येततील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या तयारीची लगबग सुरू...

अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूजाविधीला तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. याचे काही क्षणचित्रे विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते शरद शर्मा यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Ayodhya Ram Mandir Inauguration LIVE Updates : अयोध्येतील राम मंदिरात होणारी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम असा असेल -

* सकाळी 10.00 च्या सुमारास विविध राज्यातल्या कलावंताकडून पारंपरिक वाद्यांचे वादन करण्यात येणार आहे.

* सकाळी 10.30 पर्यंत सर्व निमंत्रितांना, अतिथींना प्रवेश आणि आसनास्थ होण्यासाठी प्रवेश दिला जाणार आहे.

*सकाळी 11.05 सुमाराम पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होतील.

*दुपारी 12.20 या मुहूर्तावर मोदींच्या हस्ते होणार राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठपनेच्या विधींना प्रारंभ होणार. 12 वाजून 29 मिनिट आणि 08 सेकंद ते 12 वाजून 30 मिनिट आणि 32 सेकंद या 84 सेकंदामध्ये हा शुभमुहूर्त योजिले आहे.

* यानंतर 1 वाजता पंतप्रधान मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत एक छोटेखानी भाषणात संबोधित करणार आहेत.

* दुपारी 2 नंतर निमंत्रित पाहुण्यांना प्रभुरामांचे दर्शन देण्यात येईल.

Ayodhya Ram Mandir Inauguration LIVE Updates : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा उत्साह शिगेला..

आज अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम मंदिर उद्धाटन होणार आहे. रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना पार पडत आहे. अनेक प्रमुख अतिथि, मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. याच अनुषंगाने मंदिर परीसरात कडोकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. देशभरात दिवाळीच्या सणासारखा उत्साह आहे. देशभरात दिपोत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com