Karnataka Assembly Elections : कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात धार्मिक ध्रुवीकरणावरच भर दिला जात आहे. राम, हनुमान, टिपू सुलतान, विविध मठ असे मतदारांना भावतील असे मुद्दे प्रचारात मांडले जात आहेत. (bajrang dal sends defamation notice to congress demands rs 100 crore)
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात पॉपुलर फ्रंट आँफ इंडिया आणि बजरंग दल या संघटनेवर कारवाई करण्याचा दावा केला आहे. यावरुन राजकारण पेटलं आहे.
याप्रकरणी बजरंग दलाने काँग्रेसच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या विरोधात ११० कोटी रुपयाचा मानहानीचा दावा ठोकला आहे. याबाबत चंडीगढ येथील विश्व हिंदू परिषदेच्या कायदा सेलचे सहप्रमुख वकील साहिल बंसल यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना नोटिस पाठवली आहे.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यामुळे बजरंग दलातील कोट्यवधी भक्तांचा अवमान झाला आहे. चौदा दिवसाच्या आत ११० कोटी रुपयांच्या मानहानी दंड दिला नाही तर न्यायालयात तक्रार करण्यात येईल.
धार्मिक मुद्द्यावर निवडणूक तापवायची ही गेल्या काही वर्षांतील भाजपची रणनीती आहे. कर्नाटक धार्मिक आधारावर मतांच्या ध्रुवीकरणातील महत्त्वाचे राज्य मानले जाते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामुळे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतांच्या ध्रुवीकरणाकरिता आयती संधीच मिळाली आहे.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात धार्मिक उन्माद वाढविणाऱ्या बजरंग दल आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या हिंदू आणि मुस्लीम संघटनांवर बंदी लादण्याचे सुतोवाच करण्यात आले आहे.
राम, हनुमान हे हिंदूच्या भावनेशी निगडीत असतात. बजरंग दलावर कारवाईचे काँग्रेसने आश्वासन दिले असले तरी बजरंग नाव असल्याने हनुमानाच्या विरोधात काँग्रेस असल्याचा प्रचारात मुद्दा मोदी यांनी तापविला. मतांच्या ध्रुवीकरणाकरिता भाजपला असे मुद्दे पुरेसे असतात.
कर्नाटकात काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार दौऱ्यावर होते. त्यांनी तात्काळ या मुद्द्यावर भर दिला. राम मंदिरापाठोपाठ बजरंग बली म्हणजेच हनुमानाला बंद करण्याची भाषा काँग्रेस करीत असल्याचा मुद्दा मोदी यांनी मांडला.
हिजाबचा वाद
मंगलुरू, दक्षिण कन्नड आदी किनारपट्टी भागात बजरंग दलाची ताकद आहे. उडपीमधील हिजाबचा वाद पेटविण्यात बजरंग दलाची भूमिकाही महत्त्वाची होती.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.