Muhammad Yunus News: बांगलादेशात पुन्हा उलथापालथ; मोहम्मद युनूस राजीनामा देणार

Why Is Muhammad Yunus Resigning? देशातील सध्याच्या परिस्थितीत आपण काम करू शकणार नाही, अशी भीती युनूस यांनी व्यक्त केली आहे. जोपर्यंत राजकीय पक्षाचे एकमत होत नाहीत, तोपर्यंत मी काम करू शकणार नाही, असे युनुस यांनी सांगितले अशी माहिती निहाद इस्लाम यांनी दिली आहे.
Muhammad Yunus
Muhammad YunusSarkarnama
Published on
Updated on

बांगलादेशाचे हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस हे राजीनामा देण्याच्या विचारात आहे. मोहम्मद युनूस आणि बांगलादेश लष्काराचे प्रमुख वाकर-उज-जमान यांच्यातील तणाव समोर आला आहे. ज्यावरून बांगलादेशातील परिस्थिती अधिकच बिघडताना दिसत आहे.

राजकीय पक्ष काम करण्यात अपयशी ठरले आहे, त्यामुळे त्यांना काम करणे अवघड झाले, अशी माहिती एका वृत्त एजन्सीने दिली आहे. नॅशनल सिटिझन्स पार्टीचे (राष्ट्रवादी) प्रमुख निहाद इस्लाम यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे.

तर दुसरीकडे युनुस हे भावनिक इशारा देत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. लष्कराच्या विरोधात त्याचा हा नवा डाव तर नाही ना असा प्रश्न विचारण्यात येत आहे. या वातावरणात पुन्हा एकदा बांगलादेशातील जनता रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचे चित्र आहे.

देशातील सध्याच्या परिस्थितीत आपण काम करू शकणार नाही, अशी भीती युनूस यांनी व्यक्त केली आहे. जोपर्यंत राजकीय पक्षाचे एकमत होत नाहीत, तोपर्यंत मी काम करू शकणार नाही, असे युनुस यांनी सांगितले अशी माहिती निहाद इस्लाम यांनी दिली आहे.

गेल्या फेब्रुवारी महिन्यात निहाद इस्लाम हे युनुस यांच्या पाठिंब्याने युवानेते म्हणून पुढे आले आहेत. "राजकीय पक्ष एकजूट निर्माण करतील आणि युनुस यांना सहकार्य करतील, अशी मला आशा आहे,सर्व जण त्यांना सहकार्य करतील".

Muhammad Yunus
Vaishnavi Hagawane Baby: वैष्णवीच्या बाळाची प्रकृती बिघडली; कस्पटे कुटुंबिय रुग्णालयात

युनुस यांना काम करता येत नसेल तर त्यांचा या पदावर राहण्याचा काहीही अर्थ नाही. राजकीय पक्षांना जर वाटत असेल की युनुस यांनी राजीनामा द्यावा, असे राजकीय पक्षाना वाटत असेल तर युनुस हे राजीनामा द्यावा या विचारात असेल, ते निहाद इस्लाम यांनी सांगितले.

Muhammad Yunus
Mohammad Yunus : बांगलादेशात पुन्हा काहीतरी मोठं घडणार? ; मोहम्मद युनूस यांच्या अडचणीत वाढ!

गेल्या दोन दिवसांत युनूस यांच्या सरकारला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. बांगलादेशाचे संभाव्य एकत्रित लष्करी बळ, ज्याने गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीदरम्यान महत्त्वाची भूमिका बजावली होती, हे प्रमुख आव्हान युनुस यांच्यासमोर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com