बंगालमध्ये तणाव टोकाला : राज्यपालांनी ममतांच्या परस्पर गुंडाळलं विधानसभेचे अधिवेशन

West Bengal : Mamata banerjee vs Governor Jagdeep Dhankhar : अधिवेशन विसर्जीत न करता तात्काळ गुंडाळण्याचे आदेश
Governor Jagdeep Dhankhar attacks on CM Mamata Banerjee
Governor Jagdeep Dhankhar attacks on CM Mamata Banerjee

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata banerjee) यांच्या दरम्यान तणाव चांगलाच वाढला आहे. राज्यपाल जगदिप धनखड (Governor Jagdeep Dhankhar) यांनी आज दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी विधानसभेचे अधिवेशन विसर्जीत न करता तात्काळ गुंडाळण्याचे आदेश दिले आहेत. सरकारसोबत किंवा मुख्यमंत्र्यांसोबत कोणतीही चर्चा न करता त्यांनी परस्पर हे आदेश ट्विटरवरुन जारी केले आहेत. त्यामुळे आता बंगलामध्ये राज्यपालांच्या परवानगीशिवाय कोणतेही अधिवेशन बोलवता येणार नाही.

राज्यपाल जगदिप धनकर यांनी ट्विटरवर जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, भारतीय संविधानाच्या कलम १७४ अनुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारांअन्वये, आज दिनांक १२ फेब्रुवारी २०२२ पासून राज्य विधानसभेचे अधिवेशन (विसर्जीत न करता) स्थगित करण्याचे आदेश देत आहे. यामुळे आता राज्यपालांच्या परवानगीशिवाय पश्चिम बंगाल सरकारला कोणतेही अधिवेशन बोलवता येणार नाही. त्यामुळे राज्यातील तणाव चांगलाच वाढला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com