Delhi News : "हे युद्ध इस्राईलने सुरू केले नाही. मात्र, युद्धाचा शेवट आम्हीच करणार", असा कडक इशारा इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासला दिला आहे. हमासने केलेल्या हजारो रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्त्राईलने जोरदार तयारी सुरू केली आहे. हमासविरोधात लढण्यासाठी इस्राईलने तीन लाख राखीव सैनिकांना बोलावले आहे. (Latest Political News)
युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाला उद्देशून बोलताना नेतान्याहून म्हणाले, "इस्राईल कधीही युद्धात स्वतःहून भाग घेत नाही. मात्र, हमासच्या कृत्यामुळे आमच्यावर हे युद्ध अत्यंत क्रूर आणि अमानुषपणे लादले गेले आहे. हमासने शनिवारी रॉकेटहल्ले करून युद्ध छेडले आहे. या युद्धाचा शेवट इस्राईलच करणार आहे." (Maharashtra Political News)
हमासने शनिवारी पहाटे अचानक केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत सातशेहून अधिक नागरिक ठार झाले आहेत, तर दोन हजार ३०० हून अधिक इस्राईली जखमी झाले आहेत. प्रतिहल्ला करताना नेतान्याहू यांनी हमासला याची जबरदस्त किंमत चुकवावी लागेल. हा वार त्यांच्या कायम लक्षात राहील, असाही इशारा दिला. नेतान्याहू म्हणाले, "हमासला समजेल की त्यांनी इस्राईलवर हल्ला करून ऐतिहासिक मोठी चूक केली आहे. त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि ती इस्राईलचे इतर शत्रू पुढील अनेक दशके लक्षात ठेवतील."
हमासने इस्राईली लष्कराच्या अधिकाऱ्यांसह १०० हून अधिक लोकांना ओलिस ठेवले आहे. यावर बोलताना नेतान्याहू यांनी हमासची तुलना आयसीस या दहशतवादी संघटनेशी केली आहे. ते म्हणाले, "हमास ही आयएसआयएस आहे. हमासने निष्पाप इस्राईलींवर केलेले क्रूर हल्ले धक्कादायक आहेत. कुटुंबांना त्यांच्या घरात मारणे आणि अनेक महिला, मुले आणि वृद्धांचे अपहरण केले. हे लोक रानटी असून, त्यांना कदापि सोडणार नाही."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.