Bhagwant Mann
Bhagwant MannSarkarnama

भगवंत मान यांची ऐतिहासिक घोषणा; भ्रष्टाचार रोखण्यासाठी घेतला मोठा निर्णय

Bhagwant Mann | Aam Adami Party | Punjab : ट्विट करत केली घोषणा

अमृतसर : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी काल आम आदमी पक्षाचे (Punjab Chief Minister) भगवंत मान (Bhagwant Mann) विराजमान झाले. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. शपथविधीनंतर मान यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत पंजाबची सूत्र हाती घेतली. त्यानंतर आज त्यांनी आमदारकीची देखील शपथ घेतली. सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर आज सकाळी ट्विट करत एक मोठा निर्णय घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती.

मान यांनी ट्विट करत म्हटले होते की, पंजाबच्या जनतेच्या हिताचा आज मी एक मोठा निर्णय जाहीर करणार आहे. पंजाबच्या इतिहासात असा निर्णय कोणी घेतला नसेल. लवकरच घोषणा करणार. असे ते म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील हे ट्विट रिट्विट केले होते. त्यामुळे मान नेमका कोणता निर्णय घेणार याबाबतचा सस्पेन्स वाढला होता.

अखेरीस मुख्यमंत्री मान यांनी आपला बहुप्रतिक्षीत निर्णय जाहीर केला आहे. मान म्हणाले, २३ मार्च रोजी भगतसिंग यांच्या शहिद दिनी पंजाब सरकारकडून भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईन नंबर जारी केला जाणार आहे. तो माझा स्वतःचा वैयक्तित व्हॉट्सअॅप नंबर असणार आहे. जर कोणी लाच मागितल्यास त्यांचे व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग या नंबरवर पाठवावे, भष्टाचाराच्या विरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. पंजाबमध्ये आता भ्रष्टाचार चालणार नाही, असेही मान म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com