भगवंतसिंग मान घेणार शहीद भगतसिंग यांच्या जन्मभूमीत मुख्यमंत्रीपदाची शपथ

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (AAP) मोठा विजय मिळवला आहे.
Bhagwant Mann
Bhagwant MannSarkarnama

Punjab Election Results : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाने (AAP) कोणत्याही एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला नव्हता, त्यापेक्षा जास्त जागा मिळविण्याची किमया करत पंजाबमध्ये (Punjab Election) मोठं यश मिळवले आहे. दिल्लीच्या बाहेर प्रथमच 'आप'ला इतके मोठे यश मिळाले आहे. पंजाबमधील या विजयाने आप'ने काँग्रेस, भाजप, अकाली दल या सर्वांच पक्षांना धुळ चारत पंजाबमध्ये निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे.

आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंतसिंग मान यांनी सुमारे 45 हजारांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवत काँग्रेसला पछाडले. तर, नवज्योत सिद्दू, कॅप्टन अमरिंदर सिंह, चरणजित चन्नीसह अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांचा पराभव झाला आहे. आता मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचे वेध लागले असून मुख्यमंत्री पदाचा शपथविधी कार्यक्रम विधानभवनात न घेता शहीद भगतसिंग याच्या जन्मगावी होणार असल्याचे मान यांनी जाहीर केल्याची माहिती मिळत आहे.

Bhagwant Mann
Punjab Election Results : शेतकरी आंदोलनातील सेवेचे फळ केजरीवालांना मिळाले....

आज लागलेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुक निकालात ११७ जागांपैकी सुमारे ९० जागा आपने जिंकल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूकपूर्व काळात राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांनी या निवडणुकीत आप'ला ५५- ६० जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, त्यापेक्षाही जास्त जागा आप'ने निवडून आणत प्रमुख पक्षांना व प्रस्थापितांना मोठा झटका दिला आहे. पंजाबमधील आप'च्या या यशानंतर मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंतसिंग मान यांचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अभिनंदन केले व पंजाबच्या जनतेचे आभार मानले. मान यांनी प्रचारादरम्यान सरकारी कार्यालयात मुख्यमंत्र्याच्या फोटो ऐवजी शहीद भगत सिंग आणि डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्याचे अश्वासन दिले होते. त्यानुसार ते निर्णय घेणार आहेत. सत्ता स्थापन झाल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये सरकारी कार्यालयात शहीद भगत सिंग आणि डॅा बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मान यांनी दिलेले अश्वासन ते पुर्ण करणार असल्याची माहिती पक्षाकडून सांगण्यात येत आहे.

Bhagwant Mann
भाजपचे निकाल सांगतात?...महाविकास आघाडीला परिणाम भोगावे लागतील!

दरम्यान, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या विजयानंतर कॅाग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्दू यांनी पराभव मान्य केेले आणि आप'चे विजयाबद्दल अभिनंदन केले. तर पराभवाची जबाबदारी स्विकारत आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यावर कॅाग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी थोडक्यात प्रतिक्रिया दिली आहे. कॅाग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आभार मानत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. तर, पराभवातून आपल्याला शिकायला मिळेल. तसेच जनतेची सेवा करत राहू, असे मत व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com