भाजपचे निकाल सांगतात?...महाविकास आघाडीला परिणाम भोगावे लागतील!

विधानसभा निकालांमुळे नाशिकमध्ये महिलांचा फुगडी खेळत आनंदोत्सव.
Centre Minister Bharti Pawar
Centre Minister Bharti PawarSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : देशातील विधानसभा (Assembly election Result) निवडणुकीच्या निकालात जनतेने भाजपला (BJP) स्पष्ट कौल दिला आहे. हे कौल काँग्रेस (Congress) व महाविकास आघाडीला जनतेचा इशारा आहे. त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॅा. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी सांगितले.

Centre Minister Bharti Pawar
नाशिकमध्ये `आप`चा जल्लोष, पंजाबच्या विजयाने नवीन राजकीय पर्याय!

देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड या महत्त्वाच्या राज्यांसह गोवा, मणिपुर आणि पंजाब या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. हे निकाल भाजपच्या कार्यकर्ते, नेत्यांचा आनंद वाढविणारी ठरली. त्यामुळे कार्यकर्ते, नेत्यांनी आज पक्षाचे शहराचे कार्यालय असलेच्या वसंत स्मृती कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला. तसेच शहरातील मुंबई नाका भागातही फटाके वाजवत, पेढे भरवून व पक्षाचा ध्वज घेऊन नेते, पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

Centre Minister Bharti Pawar
१८२ कोटींची वसुलीत संचालकांना सहकारमंत्र्यांचा तत्पुरता दिलासा!

राज्यमंत्री डॅा. भारती पवार म्हणाल्या, या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या होत्या. त्यांचे निकाल अतिशय बोलके आहेत. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करणाऱ्यांचे तोंड आता बंद झाले आहे. जनतेने पंतप्रधान मोदी यांच्या सबका साथ सबका विकास आणि देशात सुरु असलेल्या विकासावर विश्वास दाखवला आहे. या निकालातून जनतेने काँग्रेसला लोकशाहीची जाणीव करून दिली. काँग्रेसने आत्मपरिक्षण करण्याची ही वेळ आहे. काँग्रेसची स्थिती अतिशय वाईट झाली आहे. या पक्षाचे नेते जनतेच्या अपेक्षा. अडचणी यांपासून अतिशय दुर गेले आहेत.

त्या पुढे म्हणाल्या, राज्यातील महाविकास आघाडी सरकार जनतेचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. या सरकारला त्यांच्या चुकीच्या कामांचे परिणाम भोगावे लागतील.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com