Bharat Jodo Yatra news update
Bharat Jodo Yatra news update sarkarnama

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेला गालबोट ; युवकाने स्वत:ला पेटवून घेतलं..

Bharat Jodo Yatra : कोटामध्ये प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती पाहायला मिळाली. अनेकांनी सुरक्षाव्यवस्था भेदून राहुल गांधींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
Published on

Bharat Jodo Yatra : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये पोहचली आहे. राहुल यांच्यासोबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पायलट आदी बडे नेते सहभागी झाले आहेत. भारत जोडो यात्रेचा राजस्थानमधला आज (गुरुवार) चौथा दिवस आहे. या यात्रेला आज कोटामध्ये गालबोट लागलं आहे.

कोटामध्ये यात्रेत आज एका भाजपसमर्थक युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांच्या तत्परतेने आग विझवली. पोलिसांनी त्यांची वर्दी उतरुन या युवकाची आग विझवली. या युवकाने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.तो जखमी झाला आहे.

या तरुणाच्या मनामध्ये युवक काँग्रेसच्या धोरणाबद्दल नाराजी होती. म्हणून त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. याशिवाय, कोटामध्ये प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती पाहायला मिळाली. अनेकांनी सुरक्षाव्यवस्था भेदून राहुल गांधींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. कोटामधल्या यात्रेदरम्यान झालेली प्रचंड गर्दी पाहून राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.

Bharat Jodo Yatra news update
BJP : हिमाचलमध्ये सत्ता स्थापनेच्या खेळीसाठी 'या' दोन नेत्यांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी

नागरी विकास आणि गृहनिर्माण मंत्री असलेल्या शांती धारिवाल यांना कोटाचा विकास राहुल गांधीं दाखवायचा होता ; पण राहुल यांनी येथील कार्यक्रम आटोपता घेतला आहे. कोटामध्ये यात्रेत जमलेल्या गर्दीकडे राजस्थान सरकारमधले शक्तिशाली मंत्री शांती धारिवाल यांचं शक्तिप्रदर्शन म्हणून पाहिलं जात आहे .शांती धारिवाल हे कोटाचे आमदार आहेत आणि ते गेहलोत यांच्या जवळच्या मंत्र्यांपैकी एक आहेत.

या यात्रेचा आज भदाणा येथे शेवटचा मुक्काम असेल. बुंदी जिल्ह्यातील केशोराईपाटन येथे राहुल गांधींच्या यात्रेसाठी कॅम्प लावण्यात आला आहे. आजच्या भेटीनंतर राहुल गांधी रणथंबोरमध्ये सोनिया गांधींना भेटायला जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com