Bharat Jodo Yatra : " जर तुम्हाला पद हवं असेल, आमदार,मंत्री राहायचं असेल तर ..."; काँग्रेसचा नवा फतवा

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : ...तर राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा थांबविण्यात यावी!
Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra Sarkarnama

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. गांधी यांच्या यात्रेनं नुकताच हरियाणात प्रवेश केला आहे. यानिमित्त काँग्रेसकडून सर्व नेते,पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी नवीन आदेशवजा सूचना काढण्यात आली आहे. मात्र, काँग्रेसच्या आदेशाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. (Bharat Jodo Yatra)

राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग दोतसरा यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते.

दोतसरा म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अलवर येथील सभेत राजस्थानमध्ये मिनी यात्रा काढण्याची सूचना केली होती. यावेळी त्यांनी राजस्थानमध्ये काँग्रेसचे ३० मंत्री आहेत आणि ३३ जिल्हे असल्याचं सांगत प्रत्येक मंत्र्याला एक जिल्हा द्या आणि त्यांना १५ किलोमीटर लोकांमध्ये फिरायला लावा असा आदेश दिला होता. राहुल गांधींच्या सूचनेनंतर दोतसरा यांनी राजस्थानमध्ये मिनी पदयात्रा काढण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. याच धर्तीवर प्रत्येक कार्यकर्त्याला पदयात्रेत चालणं अनिवार्य केलं आहे.

Bharat Jodo Yatra
Eknath khadse : खडसेंनी फडणवीसांना करुन दिली 'त्या' भीष्म प्रतिज्ञेची आठवण

काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्याला महिन्यातून एकदा १५ किलोमीटर चालणं अनिवार्य असणार आहेत. तसेच २६ किंवा २७ जानेवारीपासून महिन्यातून एक दिवस पदयात्रेत चालण्याचा निर्णय घेऊ. जर कुणाला काँग्रेसमध्ये काम करायचं असेल, पद हवं असेल, आमदार,मंत्री राहायचं असेल तर त्यांना पदयात्रेत १५ किलोमीटर चालावं लागेल. महिन्यातील एक दिवस त्यांना गावातील लोकांबरोबर पदयात्रेत चालावं लागेल हे आम्ही सुनिश्चित करणार आहोत असेही राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग दोतसरा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले आहे.

Bharat Jodo Yatra
Shamburaj Desai : कर्नाटकच्या नाड्या शंभूराज देसाई आवळणार!

या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे कम्युनिकेशनचे प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे देखील उपस्थित होते.

...तर भारत जोडो यात्रा थांबविण्यात यावी!

कोरोना नियमांचे पालन भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) करण्यात यावे. नियमांचे पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबविण्यात यावी, अशा आशयाचे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी काँग्रेस नेते तथा भारत जोडा यात्रा करणारे राहुल गांधी यांना पाठविले आहे. या पत्रात कोरोनाचे कारण दिले असले तरी राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे यासंबंधीची तक्रार राजस्थानमधील भाजपच्या (BJP) तीन खासदारांनी केंद्राकडे केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com