Shamburaj Desai : कर्नाटकच्या नाड्या शंभूराज देसाई आवळणार!

Shamburaj Desai Warn to Karnataka : ...तर कर्नाटकला देण्यात येणाऱ्या पाण्याचा विचार करावा लागेल; देसाईंचा थेट इशारा!
Shamburaj Desai Basavraj Bommai
Shamburaj Desai Basavraj BommaiSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : महाराष्ट्राच्या विधानसभेपासून ते रस्त्यावर ज्याचे पडसाद उमटत आहे, तो म्हणजे महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात धुमसत असलेला सीमावादाचा प्रश्न. केंद्रिय मंत्री गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई (Basavraj Bommai) यांची दिल्लीमध्ये संयुक्त बैठक घेतली होती. सीमावादावर न्यायालय निर्णय घेत नाही, तो पर्यंत कोणीही सीमाभगावर दावा करणार नाही, तसेच आपल्या राज्यातीस कायदा सुव्यवस्था बिघडणार याची काळजी घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मात्र तरीही बोम्मई यांच्याकडून सीमावादावर भडक विधाने सुरू आहेत.

Shamburaj Desai Basavraj Bommai
Pimpri-Chinchwad : शास्ती कर रद्द होण्याची 'ही' आहे खरी अडचण

बोम्मई यांच्यावर आता राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची भाषा अरेरावीची व उद्दामपणाची आहे. सहन करण्याची ही मर्यादा असते. आमचा संयम आता सुटत आहे. आता यापुढे त्यांच्या भाषेतच उत्तर देऊ. मराठी भाषकांवर अन्याय केला, तर उन्हाळ्यात त्यांना देण्यात येणाऱ्या पाण्याचा विचार करू, असा गर्भित इशाराच शंभूराज देसाई यांनी आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना दिला.

ते पुढे म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे भडकविणारे आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेला हे अनुसरून नाही. सीमावर्ती भागातील जनतेला घाबरण्याचे कारण नाही. त्यांच्या पाठीशी राज्यातील संपूर्ण जनता आहे, असा विश्वाही त्यांनी सीमाभागातील लोकांना दिला.

Shamburaj Desai Basavraj Bommai
Ajit Gavhane : 'दुबई गुन्हेगारी कनेक्शन' असलेल्या कंपनीला पालिकेकडून 'स्मार्ट सिटीचं' कंत्राट, राष्ट्रवादीचा आरोप!

कर्नाटकने अरेरावीची भाषा थांबवली नाही, तर त्याच्या शंभर पटीने आम्हाला बोलता येते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दक्षिण दिग्विजय केला होता, याची आठवण त्यांना असावी. मार्च, एप्रिल व मे महिन्यांत त्यांना पाण्याची गरज असते. राज्यातील कोयना व कृष्णा नदीतून पाणी देण्यात येते. पाण्यासाठी त्यांच्याकडून महाराष्ट्राला विनंती करण्यात येते. त्यांचे वागणे जर असेच राहिले तर उन्हाळ्यात देण्यात येणाऱ्या पाण्याचा विचार करावा लागेल, असा सज्जड इशारा त्यांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com