Rahul Gandhi : भारत मातेने संदेश दिला अन् ..; राहुल गांधींची प्रांजळ कबुली

मी खूप फिट माणूस आहे. मी 10-12 किलोमीटर सहज धावू शकतो याचा माल गर्व झाला होता.
Rahul Gandhi :
Rahul Gandhi : Twitter @ANI

Rahul Gandhi : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काँग्रेसचे ८५ वे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी (२५ फेब्रुवारी) भाषण केल्यानंतर आज काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

यावेळी बोलताना त्यांनी भारत जोडो यात्रेतील काही आठवणी शेअर केल्या. भारत जोडो यात्रेचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले, ' गेल्या 52 वर्षांपासून माझ्याकडे स्वतःचे घरही नाही. तुम्ही केरळमध्ये मतांची शर्यत पाहिली असेल. मी संपूर्ण टीमसोबत रोईंग करत होतो. माझ्या पायात प्रचंड वेदना होत होत्या. फोटोमध्ये मी पृष्ठभागावर हसत होतो, पण आतून मी रडत होतो. मी प्रवास सुरू केला. मी खूप फिट माणूस आहे. मी 10-12 किलोमीटर सहज धावू शकतो याचा माल गर्व झाला होता. मी विचार केला, जर मी 10-12 किमी चालू शकतो तर 20-25 किमी चालण्यात काय आहे.

Rahul Gandhi :
Kasaba By-Election : मतदानासाठी तिने लंडनहून गाठलं पुणे; म्हणाली...

सकाळी उठल्यावर विचार करायचो- आज मी कसा चालणार?

कॉलेजमध्ये असताना फुटबॉल खेळताना माझ्या पायाला दुखापत झाली होती. वर्षानुवर्षे त्या दुखापतीचा त्रास झाला नाही. पण प्रवास सुरू करताच अचानक वेदना जाणवू लागायच्या. तुम्ही (कामगार) माझे कुटुंब आहात, म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो. सकाळी उठल्यावर कसं निघायचं याचा विचार करायचा. तेव्हा वाटायचे की हे चालणं काही 25 किलोमीटरचे नाही तर 3 हजार 500 किलोमीटरची गोष्ट आहे. मी कसा चालणार, असा प्रश्न मला रोज पडायचा, अशी मिश्लिक टीप्पणीही त्यांनी यावेळी केली.

10-15 दिवसात अहंकार नाहीसा झाला

सकाळी चालणं सुरु केलं की इतर लोकही आमच्या सोबतच चालायचे, माणसं भेटायची. पहिल्या 10-15 दिवसांतच माझा अहंकार आणि गर्व नाहीसा झाला. जर तुम्ही कन्याकुमारी ते काश्मीर फिरायला निघाले असाल तर मनातून हा अहंकार काढून टाक नाही तर नाहीतर चालू नकोस, असा संदेशच मला भारत मातेने मला संदेश दिला. म्हणून हा अहंकार नष्ट झाला, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.

तुगलघ लेनवरील घरही माझे नाही

यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आपल्या घराबद्दल उल्लेख केला. 52 वर्षे झाली माझ्याकडे घर नाही. आमच्या कुटुंबाचे घर अलाहाबादमध्ये आहे पण तेही आमचं घर नाही. 120 तुघलक लेन माझे घर नाही. पद यात्रेला सुरु केल्यावर मला वाटलं माझी जबाबदारी काय असेल? माझ्या आजूबाजूला, समोर आणि मागे एक रिकामी जागा आहे. ज्यामध्ये भारतातील लोक मला भेटायला येतील. हेच पुढचे चार महिने आमचे घर असेल, ते आमच्यासोबत चालेल. या घरात जो कोणी येईल, मग तो श्रीमंत असो, गरीब, वृद्ध असो, तरुण असो, बालक असो, कोणत्याही धर्माचा, राज्याचा असो, त्याला वाटावे की मी आज माझ्या घरी आल्यासारखं वाटावं, अशा भावनाही राहुल गांधीनी यावेळी व्यक्त केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com