NCP Politcal News : राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का; 'या' नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा

Ncp Politics : ऐन लोकसभा धामधुमीतच हा शर्मा यांचा राजीनामा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शर्मा यांनी ट्विटवर पोस्ट करुन आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे.
Sharad Pawar, Dheeraj Shrma
Sharad Pawar, Dheeraj Shrma Sarkarnama

Delhi News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रवक्ते धीरज शर्मा यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. ऐन लोकसभा धामधुमीतच हा शर्मा यांचा राजीनामा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शर्मा यांनी ट्विटवर पोस्ट करुन आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे.

युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या धीरज शर्मा (Dheeraj shrma) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी होती. (NCP Politcal News)

Sharad Pawar, Dheeraj Shrma
Sunil Raut News : शेलारांनी काढला उद्धव ठाकरेंचा लंडन दौरा; सुनील राऊतांचं जशास तसं प्रत्युत्तर

त्यासोबतच त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) अनेक ठिकाणी प्रचार सभा घेतल्या होत्या.

त्यासोबतच धीरज शर्मा यांच्यावर शरद पवार (Sharad Pawar) गटाने मोठी जबाबदारी टाकली होती. त्यांच्यावर भारत युवा आघाडीच्या अभिमानी राष्ट्रवादी संयोजक पदाची जबाबदारी होती. त्यांनी मोठी युवकांची मोठी फळी निर्माण केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर धीरज शर्मा हे शरद पवार गटासोबत एकनिष्ठ राहिले होते. त्यामुळे शरद पवार गटाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली होती. मात्र, शनिवारी त्यांनी अचानक सर्व पदांचा राजीनामा दिला. ट्विटवर पोस्ट करुन आपल्या राजीनाम्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Sharad Pawar, Dheeraj Shrma
Sharad Pawar Politics: टक्केवारीसाठी बंडखोरी केलेल्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश नाही!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com