Rahul Gandhi Nyay Yatra : राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; न्याय यात्रेत उडत आला अज्ञात ड्रोन अन्...

Rahul Gandhi Nyay Yatra : एका तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात...
Rahul Gandhi Nyay Yatra
Rahul Gandhi Nyay YatraSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh News : राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची न्याय यात्रा सुरू आहे. या यात्रेने आतापर्यंत अनेक राज्यांतून प्रवास केला आहे. आता ही न्याय यात्रा उत्तर प्रदेशात पोहोचली आहे. त्यांच्या या न्याय यात्रेचे यूपीतील जनतेने स्वागत केले आहे. मात्र, यात्रा उन्नावमध्ये पोहोचताच राहुल गांधींच्या सुरक्षेत त्रुटी आढळून आल्या. (Latest Marathi News)

Rahul Gandhi Nyay Yatra
Sangli NCP News : जयंत पाटलांची सांगली, हातकणंगलेत चाचपणी; प्रतीकसाठी फिल्डिंग...

उन्नाव-लखनौ बायपास मार्गावरून ही यात्रा शहरातील कानपूर रोडने गंगाघाटकडे निघाली. यात्रेसोबतच राहुल गांधी सकाळी अकराच्या सुमारास रवाना झाले. उन्नाव शहरातून राहुल गांधींचा ताफा गंगाघाटच्या सहजनी तिराहा येथून मरहाळा चौकात पोहोचला. या ठिकाणी राहुलचा ताफा काही सेकंद थांबला आणि त्यांनी कार्यकर्त्यांना हात जोडून अभिवादन केले. मात्र, या दरम्यान त्यांच्या सुरक्षेतील त्रुटी आढळून आल्या. यात्रेतील सुरक्षा पथकाला एक अज्ञात ड्रोन कॅमेरा दिसला. याची माहिती त्यांनी घटनास्थळी उपस्थित पोलिसांना दिली.

एक तरुण ताब्यात -

राहुल गांधी कारमधून बाहेर येताच त्यांच्या आजूबाजूला हा ड्रोन दिसला. त्यानंतर एका संशयित तरुणाला पोलिसांनी पकडले. पोलिस सध्या या तरुणाची चौकशी करत आहेत. राहुल यांचा ताफा अर्धा तास गंगाघाट परिसरात थांबला होता. एसपी उन्नाव सिद्धार्थ शंकर मीना यांनी सांगितले की, "या प्रकरणाचा तपास सुरू आहे. हा तरुण एक यूट्यूबर असू शकतो. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सकाळी 10 वाजता लखनऊ बायपास येथून शहरात दाखल झाली. पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली. "

Rahul Gandhi Nyay Yatra
Sangli NCP News : जयंत पाटलांची सांगली, हातकणंगलेत चाचपणी; प्रतीकसाठी फिल्डिंग...

सध्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची यात्रा जोरात सुरू आहे. राहुल गांधी यांनी या वेळी जवळपास 13 किलोमीटरचा रस्ता कव्हर केला आणि हस्तांदोलन करून लोकांचे अभिवादनही स्वीकारले. राहुल गांधींसाठी ही यात्रा खूप महत्त्वाची आहे. कारण लोकसभा निवडणुकीत कुठेतरी ही यात्रा काँग्रेसची भविष्यातील स्थिती आणि दिशा ठरवेल, अशी आशा काँग्रेसला (Congress) आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com