Military Chopper Crashed : मोठी बातमी! अरुणाचलमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळलं...

Military Chopper Crashed : बचावकार्यासाठीही अडचणी येत आहेत.
Military Chopper Crashed News Arunachal
Military Chopper Crashed News Arunachal Sarkarnama
Published on
Updated on

Military Chopper Crashed:अरुणाचल प्रदेशमध्ये आज (ता.२१ ऑक्टोबर) सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील तुतिंग मुख्यालयापासून 25 किमी अंतरावर असलेल्या सिंगिंग गावाजवळ भारतीय लष्कराचे (Indian Army) हेलिकॉप्टर कोसळलं आहे.

मिळालेल्या माहितानुसार ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही. यामुळे अशा परिस्थितीत बचावकार्यासाठीही अडचणी येत आहेत. मात्र, घटनास्थळी बचाव पथक पाठवण्यात आले आहे. या अपघातामध्ये किती नुकसान किंना जिवीत हानी झाली हे आद्याप कळाले नाही. (Military Chopper Crashed News Arunachal )

मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराचे हे अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर (ALH) सकाळी 10.40 वाजताच्या सुमारास क्रॅश झाले आहे. दरम्यान या वर्षाच्या सुरुवातीला 5 ऑक्टोबर ला देखील अरुणाचल प्रदेशमध्येच लष्कराचं चित्ता हेलिकॉप्टरलाही अपघात झाला होता, ज्यामध्ये एक पायलट शहीद झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com