Kiren Rijiju News : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे.
मंत्री किरेन रिजिजू हे आज जम्मू-श्रीनगरच्या महामार्गावरून प्रवास करत होते. यावेळी त्यांच्या कारला एका ट्रकने धडक दिल्याचे वृत्त आहे. या अपघातामध्ये कुणालाही जास्त दुखापत झाली नसून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हे थोडक्यात बचावले आहेत.
या अपघातानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये काही सुरक्षा रक्षक किरेन रिजिजू यांना कारमधून बाहेर काढताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये काही सुरक्षा रक्षक हे अपघातानंतर गाडीच्या दिशेन धाव घेताना दिसत आहेत. तर सुरक्षा रक्षक गाडीजवळ पोहोचल्यानंतर किरेन रिजिजू हे बाहेर येताना दिसत आहेत. या अपघातात कुणालाही जास्त दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या गाडीला झालेल्या अपघाताला पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. रिजिजू यांच्या गाडीला जम्मूवरून श्रीनगरला जात असताना किरकोळ अपघात झाला. यामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही. तसेच किरेन रिजिजू हे सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
(Edited By Ganesh Thombare)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.