राष्ट्रपती निवडणुकीसाठी अभिजीत बिचुकले यांची अशी आहे रणनीती

आपल्या न्यायपालिका, केंद्रातील विविध निर्णय, देशातील प्रमुख यंत्रणा या सर्वांवरच राष्ट्रपतींचा मोठा दबाव असतो.
Abhijit Bichukale News, President Election 2022 News
Abhijit Bichukale News, President Election 2022 Newssarkarnama
Published on
Updated on

पुणे : आतापर्यंत विविध निवडणुका लढवणारे सेलिब्रेटी आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले बिग बॉस (Bigg Boss) फेम अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) हेदेखील राष्ट्रपती निवडणुकीत आपलं नशीब आजमवू पाहात आहेत. ( Abhijit Bichukale latest Marathi news)

अभिजीत बिचुकले यांनी ग्रामपंचायत सदस्यापासून ते आमदार,खासदार आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुका (President Election 2022) लढविल्या आहेत. मात्र, त्यांना कोणत्याच निवडणुकीत यश आलेलं नाही.

राष्ट्रपती पदासाठी मी इच्छुक आहे. त्यासाठी माझी रणनिती तयार आहे. आपल्या न्यायपालिका, केंद्रातील विविध निर्णय, देशातील प्रमुख यंत्रणा या सर्वांवरच राष्ट्रपतींचा मोठा दबाव असतो. त्यामुळे या पदावर असणार व्यक्ती सक्षम असायला हवा. राष्ट्रपतींनी देशासाठी अनेक गोष्टी करण्यची आवश्यकता असते. मात्र, ते त्या गोष्टी करताना अजिबात दिसत नाहीत. त्यामुळे आपणास संधी मिळाली तर आपण त्या गोष्टी नक्की करु. माझ्या डावपेचांना नक्की यश येईल," असा दावाही अभिजीत बिचुकले यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

Abhijit Bichukale News, President Election 2022 News
Presidential Election : राजनाथ सिंह यांचा उद्धव ठाकरेंना फोन

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आपल्या अर्जावर अनुमोदन करण्याची संख्या मिळाली, तर माझा अर्ज 100 टक्के, दाखल होणार, असे बिचुकले यांनी म्हटले आहे. त्यासाठी सांगली, कोल्हापूर, पुण्यातील खासदारांशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

"आपण निर्व्यसनी, प्रामाणिक आणि सुशिक्षित आहोत. आपल्याला कायद्याचीही चांगली माहिती आहे. त्यामुळे आपणास अनुमोदन मिळावे यासाठी आपण पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही आमदारांशी खासदारांशी बोलत आहे. आमदार खासदारांनी जर सह्या दिल्या तर सगळे जमून येईल," असेही बिचुकले यांनी म्हटले आहे.

एनडीएच्या वतीने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी राजनाथ सिंह चर्चा करत आहेत.राष्ट्रपती पदाची निवडणूक १८ जूलै रोजी होणार आहे. २९ जूनपर्यंत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजनाथ सिंह यांनी फोन केला होता. या चर्चेमध्ये राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपती निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

राजनाथ सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीसुद्धा काल फोनवर चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरेंकडे राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपती पदाबाबत समर्थन देण्याची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com